Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: 'हम काले है तो क्या हुआ'; वर्णभेदावरुन नवाजने केली होती टीका

नवाजुद्दीन सिद्दीकी दमदार अॅक्टिंग आणि बिनधास्तपणासाठी ओळखला जातो. नवाजुद्दीन कोणत्याही विषयावर आपले परखड मत मांडण्यास कधीच मागे राहत नाही.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी दमदार अॅक्टिंग आणि बिनधास्तपणासाठी ओळखला जातो. नवाजुद्दीन कोणत्याही विषयावर आपले परखड मत मांडण्यास कधीच मागे राहत नाही. तो अनेकदा इंडस्ट्रीत होणाऱ्या भेदभावाबद्दलही उघडपणे बोलला आहे. इतकंच नाही तर त्याने वर्णभेदावरुनही आपले परखड मत मांडले आहे. अशा परिस्थितीत नवाजुद्दीनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या रंगाबद्दल मोठे विधान केले आहे. यासोबतच त्याने स्मिता पाटील यांचेही कौतुक केले होते.

एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने खुलासा केला होता की, इंडस्ट्रीतील 'वर्णद्वेषी' लोकांमुळे अनेकदा काही गोष्टींचा सामना करावा लागला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनला विचारण्यात आले होते की, इंडस्ट्रीत रंगामुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला होता का?

यावर त्याने उत्तर दिले की, "जर त्यांना गोर्‍या लोकांची गरज असेल तर त्यांना माझीही गरज आहे. सध्या मला मागणी आहे. काळ्या रंगाच्या लोकांना आजकाल खूप मागणी आहे. कॅमेरा जे सौंदर्य टिपू शकतो ते खूप वेगळे आहे. हे एक प्रामाणिक प्रकारचे सौंदर्य आहे."

सोबतच तो पुढे बोलतो, " सैराटमधील रिंकू राजगुरू पाहा. गोरी नसतानाही, चित्रपटातील तिचा अभिनय तुम्हाला चित्रपटात व्यग्र करुन ठेवतो. मी चित्रपट पाहताना एका क्षणी म्हटलं होतं, ही मुलगी खूप सुंदर आहे. सोबतच इतर भारतीय अभिनेत्रींप्रमाणे स्मिता पाटीलचे सौंदर्य कॅमेऱ्याने टिपले नाही, असे मला प्रामाणिकपणे वाटते. माझ्या मते ती कॅमेऱ्यासमोर सर्वात सुंदर अभिनेत्री होती. मला वाटते की, कॅमेऱ्यासमोरील सौंदर्य रियल लाईफमधील सौंदर्यापेक्षा खूप वेगळे आहे."

विशेष म्हणजे, नवाजुद्दीनने हे विधान त्याच्या 'नूरानी चेहरे' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान केले होते. त्याची कथा एका सौंदर्यवती भोवती आहे. गोऱ्या रंगाबद्दल आवड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात क्रिती सेननची बहीण नुपूर सेननही दिसणार आहे.

नवाजन 'हिरोपंती 2' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच फ्लॉप झाला होता. लवकरच नवाजुद्दीन 'हड्डी' या चित्रपटात एका तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT