मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan At Pune: कार्तिक आर्यन पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपतीचे दर्शन; फोटो व्हायरल

कार्तिक आर्यनने नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan Visit Shreemant Dagdusheth Halwai Ganpati:

कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिकने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यशाच्या शिखरावर असलेला कार्तिक तितकाच देवभोळा आहे.

गणेश चतुर्थी दिवशी कार्तिक आर्यनने लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. कार्तिकचा लालबाग राजाच्या दर्शनाचा व्हिडीओ खुप व्हायरल देखील झाला होता.

कार्तिक आर्यनने नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे. इंस्टंट बॉलिवूड या पेजने कार्तिक आर्यनचे फोटो शेअर केले आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्ठानाने कार्तिक आर्यनला गणपतीची मुर्ती भेट म्हणून दिली. गणपतीच्या दर्शनासाठी कार्तिक आर्यन पारंपरिक वेशात गेला होता. कार्तिकने गुलाबी रंगाचा सदरा घातला होता.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर, तो सध्या त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याआधी त्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्यारी कियारा अडवाणी देखील होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT