Annu Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Annu Kapoor Health Update: अभिनेते अन्नू कपूर यांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Annu Kapoor: प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Bollywood News)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नू कपूर यांना २६ जानेवारीला सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्नू कपूर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार्डिओलॉजीचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Latest Marathi News)

अन्नू कपूर यांची कारकीर्द

अन्नू कपूर उत्तम अभिनेते आहेतच, सोबतच एक अप्रतिम गायक देखील आहेत. याशिवाय ते दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टीव्ही होस्टही राहिले आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

यासोबतच ते टीव्ही शोचाही भाग राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि टीव्ही अकादमी पुरस्कार जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT