Vikram Gokhale Amitabh Bachchan Friendship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vikram Gokhale: फक्त विक्रम गोखलेंसाठी अमिताभ बच्चन झळकले होते मराठी चित्रपटात, तुम्ही पाहिलाय का तो सिनेमा?

अमिताभ आणि विक्रम गोखले हे एकमेकांना गेली ५५ वर्ष ओळखत असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगिले होते.

Pooja Dange

Vikram Gokhale Amitabh Bachchan Friendship: दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे आज वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले आहे. विक्रम गोखले जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अनेक आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील. विक्रम गोखले यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. त्यांच्या अनेक कलाकृतींपैकी एक चित्रपट म्हणजे एबी आणि सीडी. विक्रम गोखले यांच्या या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. अमिताभ बच्चन यांनी फक्त विक्रम गोखले यांच्या मैत्रीपोटी या चित्रपटामध्ये केले होते.

विक्रम गोखले यांनी स्वतः याविषयी सांगितले. एका मुलाखतीत विक्रम गोखले यांनी हा खुलासा केला होता. अमिताभ आणि विक्रम गोखले हे एकमेकांना गेली ५५ वर्ष ओळखत असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगिले होते. तसेच अमिताभ एक सच्चा माणूस आहे, आम्ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे असे ते म्हणाले होते. अमिताभ यांनी सुद्धा विक्रम यांनी 'हा चित्रपट मी फक्त तुझ्यासाठी करत आहे', असे सांगितले होते. तसेच त्यांनी या चित्रपटासाठी एकही रुपया घेतला नव्हता. (Vikram Gokhale)

एबी आणि सीडी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते. तर अमिताभ बच्चन यांनी पाहुने कलाकार म्हणून या चित्रपटामध्ये हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचा हा पहिला मराठी चित्रपट होता. अमिताभ यांनीही या चित्रपटासाठी एकही रुपया घेतला नाही. तसेच त्यांनी चित्रपटासाठी लागणारे कपडे सुद्धा स्वतःच्या घरून आणले होते. (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन यांनी एबी आणि सीडी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कपड्यांचे माप घेण्यासाठी कारागीर पाठवत आहे असे सांगितले. अमिताभ यांनी त्यावर काळजी करून नको मी माझे कपडे घेऊन येतो असे अगदी विनम्रपणे सांगितले. शूटिंगच्या दिवशी अमिताभ बच्चन त्याच्या व्हॅनिटीमध्ये त्यांचे कपडे घेऊन आले होते. तसेच त्यांनी चित्रपटाचे डबिंग देखील स्वतःच केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT