Amitabh Bachchan Saam tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली.

Satish Daud

Amitabh Bachchan Corona Positive : बॉलिवूड अभिनेते बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझा कोरोना तपासणी (Corona Positive) अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची टेस्ट करून घ्या असं आवाहन बच्चन यांनी केलं आहे.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. यापूर्वी जुलै 2020 मध्ये त्यांना कोरोनाची लागण जाली होती. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र आणि अभिनेता अभिषेक बच्चनला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यावेळी अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, सून ऐश्वर्या रॉय बच्चन यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता.

अमिताभ बच्चन यांना कोरोना कसा झाला?

सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 14' चे शूटिंग करत आहेत. या सेटवर शूटिंग करताना कोरोना नियमांचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. मात्र, तरी देखील त्यांना कोरोना कसा झाला याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. अमिताभ यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं की नाही? ते रुग्णालयात दाखल झालेत की नाही?, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT