Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video Instagram/ @akshaykumar
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video: 'लग्न झालंय विसरलास का?' नोरासोबतचा डान्स अक्षयच्या अंगलट... ट्विंकलची दिली धमकी

अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री नोरा फतेहीसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Chetan Bodke

Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'सेल्फी' या चित्रपटाच्या अनोख्या प्रमोशनमुळे अक्षय बराच चर्चेत आहे. अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री नोरा फतेहीसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्याचे 'कुडीये नी तेरी'या गाण्यामध्ये त्यांची हटके लव्ह केमिस्ट्री दिसून येत आहे. हे गाणे अक्षयच्या आगामी सेल्फी चित्रपटातील आहे.

नुकताच हा व्हिडिओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. अक्षयने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “@norafatehi कोणत्याही वातावरणाला आगीत कसे बदलू शकते ते येथे आहे. तुमचा #KudiyeeNiTeri vibe काय आहे?"

अक्षयच्या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी त्याचे कौतूक केले आहे तर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणतो, “ट्विंकल खन्नाला तुमचे लोकेशन जाणून घ्यायचे आहे.” तर आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणतो, “ हा व्हिडिओ ट्विंकल खन्नाला टॅग करा.” तर आणखी एक युजर म्हणतो, “55 वर्षांचा असलेला अक्षय खूपच तरुण दिसतो.” अशा प्रकारे त्याची खिल्ली उडवली आहे. तर आणखी एक नेटकरी अक्षयला म्हणतो, “अक्षय तुझे वय किती आहे? हा मोठा प्रश्न मला पडलाय. तू या व्हिडिओमध्ये एका २० वर्षाच्या मुलासारखा दिसत आहे.”

हा व्हायरल होणारा व्हिडिओ फिल्म सिटीमधील 'द कपिल शर्मा'च्या सेटवरील आहे. सोबतच नोराचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. ज्यात ती चालत येत असते. तितक्यात तिच्या मागे एक बस असते. त्या बसमध्ये असलेले सर्वच प्रवासी तिला पाहताच आनंदाने कल्ला करतात.

अक्षय आणि इमरान हाश्मी अभिनीत 'सेल्फी' हा मल्याळम चित्रपट ड्रायव्हिंग लायसन्सचा हिंदी रीमेक आहे, ज्यात प्रामुख्याने पृथ्वीराज सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी भूमिका केली होती. 'कुडिये नी तेरी वाइब' हे गाणे द प्रोपेह सी आणि झहरान एस खान यांनी गायले आहे.

'सेल्फी' सोबतच अक्षय 'ओ माय गॉड 2' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ 2' मध्ये दिसणार आहे. सोबतच महत्वाची बाब म्हणजे, अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट या वर्षात दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT