Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul-Jackky Wedding: रकुल प्रीत- जॅकीच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी, मेन्यूमध्ये काय- काय असणार?

Rakul Preet And Jackky Wedding Menu Dishes: रकुल प्रीतच्या लग्नाबाबत एक-एक अपडेट्स समोर येत आहेत. रकुल प्रीत आणि जॅकीचे लग्न कसे असणार आहे, त्यांच्या लग्नाला कोण-कोण पाहुणे येणार आहे, लग्नातील जेवणाचा मेन्यू काय असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहे.

Priya More

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani:

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हे कपल विवाहबंधनात (Rajul-Jackky Wedding) अडणार आहेत. गोव्यामध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या या कपलचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू आहेत. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नासाठी रविवारीच गोव्यामध्ये पोहचले. या कपलच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील गोव्यामध्ये पोहचले आहेत.

19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याच्या प्री-वेडिंग विधींना सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारीला त्यांचे लग्न होईल. सध्या त्यांच्या लग्नाबाबत एक-एक अपडेट्स समोर येत आहेत. रकुल प्रीत आणि जॅकीचे लग्न कसे असणार आहे, त्यांच्या लग्नाला कोण-कोण पाहुणे येणार आहे, लग्नातील जेवणाचा मेन्यू काय असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहे.

रकुल प्रीत सिंग ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या १० वर्षांपासून ती या इंडस्ट्रीमध्ये आहे. तर तिचा होणारा पती जॅकी भगनानी देखील या इंडस्ट्रीतील मोठा चित्रपट निर्माता आहे. अनेक अभिनेत्यांसोबत त्याची चांगली ओळख आहे. अशामध्ये या कपलच्या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्स उपस्थित असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक सेलिब्रिटी गोव्यासाठी रवाना झाले तर काही गोव्यामध्ये पोहचले देखील.

रकुल प्रीत आणि जॅकीच्या ग्रँड वेडिंगला अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे सहभागी होणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि वरुण धवन सारखे स्टार्स देखील या लग्नामध्ये सहभागी होणार आहेत. या लग्नासाठी अक्षय कुमार रविवारीच आपल्या कुटुंबासोबत गोव्याला गेला. भूमी पेडणेकर देखील गोव्यामध्ये पोहचली आहे. तर वरुण धवन आज आपल्या पत्नीसोबत गोव्याला रवाना झाला. एअरपोर्टवर या सेलिब्रिटींना स्पॉट करण्यात आले. लग्नाला येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांना लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासाठी युसूफ इब्राहिमची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रकुल प्रीत आणि जॅकीच्या लग्नाचा मेन्यू खास पाहुण्यांना लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सारखे फिटनेस फ्रीक कलाकार देखील लग्नाचा एक भाग असणार आहेत. अशा परिस्थितीत, पदार्थ पूर्णपणे हेल्दी राहतील याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. पदार्थांमध्ये ग्लूटेन फ्री आणि शुगर फ्री डिशेसला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय स्टार्सचे आवडते पदार्थ लक्षात घेऊन शुशी फूड्सचाही समावेश करण्यात आला आहे. स्टार्स व्यतिरिक्त इतर पाहुण्यांना लक्षात घेऊन विविध प्रकारचे देशी-विदेशी पदार्थही लग्नाच्या मेन्यूमध्ये असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT