Rakul Preet Singh Instagram @rakulpreet
मनोरंजन बातम्या

Rakul Preet Singh: रकुलच्या अडचणीत वाढ, मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीने बजावले समन्स...

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच गाजत आहे. या प्रकरणी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी अभिनेत्रींचे नाव समोर येत आहे.

Chetan Bodke

Rakul Preet Singh: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरण बरेच गाजत आहे. या प्रकरणी नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी अभिनेत्रींचे नाव समोर येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एक नवे नाव यात जोडले गेले. ते नाव म्हणजे रकुल प्रीत सिंह. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.

टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने रकुलला समन्स बजावले असून 19 डिसेंबरला तिला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ईडीने सप्टेंबर महिन्यात रकुलला चौकशीसाठी बोलावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने टॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांची चौकशी केली आहे.

सप्टेंबरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास अडीच तास रकुलची चौकशी केली होती. हे प्रकरण जवळपास 40 वर्ष जुने ड्रग्स संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने यापूर्वी या प्रकरणात अनेक कलाकारांना समन्स बजावले आहेत. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017 मध्ये 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते आणि या प्रकरणी 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी 11 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

ईडीने या प्रकरणाची चौकशी केली असती, त्यांना यामध्ये मनी लाँड्रिंगचा संशय आला होता. या चौकशीत ईडीने रकुल प्रीत सह चार्मे कौर, पुरी जगन्नाथ, तेजा, मुमैथ खान आणि राणा दग्गुबती यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सोबतच रकुलची सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ही तिची चौकशी करण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती. ड्रग्स प्रकरणात या सर्वांची चौकशी झाली होती. जरी रकुलचे चौकशीत नाव पुढे आले असले तरी ती यामध्ये आरोपी नव्हती.

रकुलच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर, लवकरच तिचा ' छत्रीवाला' चित्रपट येत आहे. यामध्ये ती एका कंडोम टेस्टरच्या भूमिकेतून दिसणार आहे. त्याची गुणवत्ता तपासणे तिचे काम आहे. तिच्यासोबत चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT