Bluegrass singer Ronnie Bowman passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंब बुडाले शोकसागरात

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचे अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे संगीतविश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Singer Death: ब्ल्यूग्रास आणि कंट्री संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक रॉनी बोमन यांचे वयाच्या 64 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे. मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायक रॉनी बोमन यांचा टेनेसी राज्यातील अशलँड सिटी परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गायक रॉनी बोमन हे ब्ल्यूग्रास आणि कंट्री संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचे नाव होते. आपल्या खास आवाज आणि उत्कृष्ट गीतलेखनामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी एकल कलाकार म्हणून तसेच विविध बँडसोबत काम करत मोठी कारकीर्द घडवली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली. विशेष म्हणजे, त्यांनी प्रसिद्ध गायक क्रिस स्टेपलटन यांच्या “Nobody to Blame” या गाण्याचे सहलेखन केले होते. ज्याला अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले होते. तसेच त्यांनी लोरेटा लिन, ली ॲन वोमॅक आणि ब्रुक्स अँड डन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले होते.

त्यांच्या “Cold Virginia Night” या अल्बमला प्रचंड यश मिळाले होते. 1995 मध्ये या अल्बमला ‘अल्बम ऑफ द इयर’ आणि ‘सॉंग ऑफ द इयर’ असे अनेक पुरस्कार मिळाले होते. तसेच त्यांना ‘मेल व्होकलिस्ट ऑफ द इयर’ हा मानही अनेक वेळा मिळाला होता.

गायक रॉनी बोमन यांच्या निधनानंतर संगीतविश्वातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे कुटुंब या त्यांच्या जाण्याने शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT