Amruta Deshmukh And Kiran Mane  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'संगमरवरी दगड आहे की आणखी काय...' अमृता किरण मानेला चावडीवर जर स्पष्टच बोलली

नुकतेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत पुण्याच्या टॉकरवडी आरजे आणि अभिनेत्री अमृतासाठी पहिली पहिली चुगली आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Latest Update: बिग बॉसच्या मराठीच्या घरातील रोज काही तरी रंजक पाहायला मिळत आहे. या रंजक दृष्टीने पाहिलेले घरातील वातावरण सर्वांनाच एक खेळण्याची वेगळी दृष्टी देते. गेल्या महिनाभरापासून बिग बॉसच्या घरात कोणत्या तरी विषयावरुन भांडण होत आहे.

त्यामुळे कधी घरात तंटामुक्ती वातावरण तर कधी चिडचिड करणारे वातावरण घरात असयाचे. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन स्पर्धकांना घरचा नारळ मिळाला. त्यात पहिला स्पर्धक डॉ. निखिल राजेशिर्के तर दुसऱ्या आठवड्यात घुंगराच्या तालावर अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या लावणी क्विन मेघा घाडगे ला घराबाहेर जावे लागले.

आठवड्यातील प्रत्येक स्पर्धकाचे कारनामे आणि केलेली सर्व कामे शनिवारी आणि रविवारी चावडीवर सोडवले जाते. महेश मांजरेकर सर्व स्पर्धकांच्या कामाचा लेखाजोखा या चावडीवर पाहणार आहेत. कोणाचे कौतुक तर कोणाची कानउघडणी यावेळी मांजरेकरांनी केली.

चावडीवर प्रत्येक स्पर्धकाची शाळा घेत त्यांच्यावर भडकलेले ही मांजरेकर दिसले. सोबतच आजच्या भागात चुगली बुथच्या माध्यमातुन हा एपिसोड आणखी रंजक बनवला आहे. नुकतेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत पुण्याच्या टॉकरवडी आरजे आणि अभिनेत्री अमृतासाठी पहिली पहिली चुगली आली आहे. या एपिसोडमध्ये मांजरेकर चुगली बुथ उघडणार आहेत.

किरण मानेंनी अमृातची चुगली विकासजवळ सांगितली होती. त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेखही करण्यात आला आहे. ही चुगली पाहून किरण मानेवर अमृता चांगलीच भडकली असून बाहेर येताच चांगलेच टिकेचे बाण सोडले आहे. अमृताला चुगली होती की, 'किरण माने विकासला सांगत होते, लव्ह अँगल बनवायला सुद्धा एक स्पार्क लागतं, आणि अमृता देशमुख नुसता एखाद्या दगडासारखी घरातून इकडे-तिकडे घरंगळत आहे.'

ही चुगली वाचून अमृता बाहेर येताच किरणला बोलते, 'मी ठरवलं तर भूमितीमध्ये 150 पैकी 150 मार्क मिळवू शकते इतके माझे अँगल चांगले आहेत. आणि मी दगड आहे म्हणता, तर मी साधारण दगड आहे, संगमरवरी दगड आहे कि आणखी कोणता हे येणारा काळ सांगेलच.

पण तुम्हीसुद्धा थोडे घरंगळलात घरामध्ये इकडे-तिकडे तर तुम्हाला घरात काय-काय गोष्टी सुरु आहेत याचा थोडासा अंदाज येईल. आणि आपली सर्वांची ओळखही येईल.' अमृाताच्या या प्रत्युत्तराने साऱ्यांनाच हसु आवरणे काही काळ कठीण झाले.

चावडीवर महेश मांजरेकर एक मुद्दा मांडत असतात. हा मुद्दा नाट्यरुपांतरचा टास्कदरम्यानचा असतो. तेव्हा किरण माने म्हणतात, मला नाट्यरुपांतरामध्ये भाग घ्यायचा होता, परंतु माझ्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यानंतर विकासने दूध का पिलं? यावरुन घरात जोरजोरात राडे होतात.

त्यानंतर अपूर्वा नेमळेकर माझ्याकडे येते आणि मला म्हणते, माने डोन्ट प्ले गेम, परंतु ती नेमकं कशाबाबत बोलत होती मला काहीही माहिती नव्हतं, आणि त्यानंतर कोंबडीची पिल्लेही मागून येऊन मला बोलू लागली. अपूर्वाच्या टीममधील स्पर्धकांना कोंबडीची पिल्ले बोलल्यामुळे अपूर्वा आणि अक्षय किरण मानेवर भडकतात आणि त्यांना जपून शब्द वापरण्यासाठी सांगतात.

हा सर्व वाद मांजरेकरांच्या चावडीवर गेल्यानंतर काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT