Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: स्‍काउट OPला बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट, कधीही होऊ शकतो घराबाहेर!

Bigg Boss 20: बिग बॉस 20मध्ये स्काउट OP आणि यंग DSA यांच्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा वाद झाला. यंगला धक्का दिल्यानंतर बिग बॉसने स्काउटला चार शिक्षा सुनावल्या आहेत.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात पुन्हा एकदा मोठा वाद पाहायला मिळाला आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्काउट OP आणि यंग DSA यांच्यात जोरदार भांडण झाले. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, हा वाद इतका वाढला की स्काउटने रागाच्या भरात यंगला धक्का दिला. या घटनेमुळे घरातील वातावरण चांगलेच तापले. अखेर बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी करत टास्क थांबवला. विशेष म्हणजे, या घटनेनंतर बिग बॉसने स्काउटला चार मोठ्या शिक्षा सुनावल्या आहेत.

कॅप्टन्सी टास्कदरम्यान दोघांमध्ये वाद

मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन्सी टास्कच्या दुसऱ्या फेरीत हा प्रकार घडला. या टास्कमध्ये उदिती सिंह रोबोटच्या खुर्चीवर बसली होती. टीम A मधील स्पर्धकांंना तिला भावूक करून रडवायचे होते. यावेळी स्काउटने उदितीच्या कुटुंबाचा फोटो वापरून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने फोटोचा एक कोपरा थोडासा जाळला. स्काउटच्या या कृतीमुळे गुल्लू आणि यंग नाराज झाले. त्यांनी त्याला असे न करण्यास सांगितले. मात्र, स्काउटने त्यांचे ऐकले नाही.

स्काउटने रागाच्या भरात यंगला दिला धक्का

यानंतर स्काउट आणि यंग यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. दोघांनीही एकमेकांना अपशब्द वापरले. वाद वाढत असताना स्काउटने रागाच्या भरात यंगला धक्का दिला. यामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. यंगनेही स्काउटला स्पष्टपणे सांगितले की, आता तो त्याला आपला मित्र मानत नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बिग बॉसने टास्क थांबवला. तसेच स्काउटला बेडरूममध्ये आणि यंगला गार्डन एरियामध्ये जाण्यास सांगितले.

स्काउटने मागितली माफी, पण आम्रपाली नाराज

काही वेळाने वातावरण शांत झाल्यानंतर स्काउट यंगजवळ गेला आणि त्याला धक्का दिल्याबद्दल माफी मागितली. सुरुवातीला यंग त्याच्याशी बोलण्यास तयार नव्हता. मात्र, नंतर त्याने स्काउटला माफ केले. दुसरीकडे, आम्रपालीला यंगने घेतलेला हा निर्णय आवडला नाही. स्काउटविरोधात बिग बॉसकडे कठोर कारवाईची मागणी करायला हवी होती, असे तिचे मत होते. कारवाई झाली नाही तर शो सोडण्याचाही विचार करावा, असे तिने यंगला सांगितले.

स्काउटला मिळाल्या चार मोठ्या शिक्षा

या संपूर्ण प्रकारानंतर बिग बॉसने स्काउटसाठी चार शिक्षा जाहीर केल्या आहेत. यानुसार, स्काउट आता संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट झाला आहे. त्याला यापुढे कोणत्याही कॅप्टन्सी टास्कमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच घरात कोणतीही खास पॉवर त्याला मिळणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बिग बॉसला कोणत्याही क्षणी स्काउटला घरातून बाहेर काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईनंतर स्काउटचा बिग बॉसमधील प्रवास कसा असणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेश नाईक यांच्या मंत्रालयासमोरील 'पावनगड' शासकीय बंगल्याला लागलेली आग आटोक्यात

Corona Virus : कोरोनाचा नवा व्हेरियंट! PJ.2.1 मुळे पुन्हा धडकी; काय आहेत लक्षण? जाणून घ्या

Cleaning Hacks : घरातील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंध येतोय का? हे ५ सोपे उपाय नक्की करुन बघा

Indian Railways : ट्रेनच्या खिडकीला काच असूनही लोखंडी जाळी का असते? ९०% लोकांना माहीत नाही यामागचं कारण

Ganesh Naik : मोठी बातमी! मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला भीषण आग, मुंबईत आगीचे सत्र सुरूच

SCROLL FOR NEXT