Mumbai: गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर आग Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai: गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर आग

गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली.

सुरज सावंत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) सेटवर आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉसच्या सेटवर आग (Bigg Boss Set Fire) लागल्यावर अग्निशमन (Firefighting) दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचले असल्याची सांगण्यात येत आहे. बिग बॉसच्या (Big Boss) सेटच्या नेमक्या कोणत्या भागाला आग लागली आहे, याची माहिती आजून समोर आली नाही.

हे देखील पहा-

आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोच्या १५व्या सीझनचा फिनाले काही काळ अगोदरच पार पडला आहे. या फिनालेचा भव्य प्रीमियर (Premier) आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बिग बॉस १५ चे सर्व स्पर्धक उपस्थित होते. 'बिग बॉस'च्या सेटवर आग लागल्यावर चांगलाच गोंधळ उडाला आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. ‘बिग बॉस ११५विषयी सांगायचे तर, करण कुंद्रा, सिम्बा नागपाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, रश्मी देसाई आणि तेजस्वी प्रकाश यांसारख्या सेलिब्रिटींनी यामध्ये भाग घेतला होता. शोमध्ये ३ महिन्यांहून अधिक काळ झाल्यानंतर, तेजस्वी प्रकाशने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली आहे. याबरोबरच तिला एकता कपूरच्या लोकप्रिय 'नागिन ६'च्या नवीन सीझनमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT