bigg boss season 16 Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या १६ व्या सीझनमध्ये येणार 'हा' कॉमेडियन, घरात कोण-कोण? जाणून घ्या...

bigg boss season 16 contestants: लवकरच 'बिग बॉस' चा १६ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सर्वात जास्त कलाकार मंडळी चर्चेत येतात तो शो म्हणजे 'बिग बॉस'. (Bigg Boss) बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकार मंडळी 'बिग बॉस'मुळे खूप प्रसिद्ध होतात आणि त्यांच्यावर नेटकरी चांगलीच टीकेची झोडही उठवतात. लवकरच 'बिग बॉस' चा १६ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच करणार आहे. (Bigg Boss 16 Marathi News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'चा १६ वा सीझन ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. अजूनही 'बिग बॉस'ची तारीख गुलदस्त्यातच आहे. नेहमीच 'बिग बॉस'च्या सीझनमधील वेगवेगळ्या थीमची चर्चा होते. 'बिग बॉस'च्या १५व्या सीझनसाठी जंगलाची थीम होती. आता १६ व्या सीझनसाठी नक्की कोणती थीम असणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण होत आहे. 'बिग बॉस'चा १५ वा सीझन ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. तसेच ओटीटीवर प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिला होता. परंतू 'बिग बॉस'चा १६ वा सीझन ओटीटीवर लगेच प्रदर्शित होणार नाही. जर ओटीटीवर 'बिग बॉस'चा १६वा सीझन पाहायचा असेल, तर प्रेक्षकांना पुढच्या वर्षापर्यंतची वाट पाहायला लागू शकते.

या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार हजेरी लावणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चांगलीच दिसत आहे. सध्यातरी पहिले नाव जाहीर झाले आहे. तो म्हणजे, कॉमेडियन मनुवर फारूकी. 'बिग बॉस'चा १६च्या घरात कोण येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Edited By - Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT