Bigg Boss OTT 2 Host Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Contestants: 'बिग बॉस ओटीटी 2'च्या स्पर्धकांची फायन लिस्ट; या कलाकारांचा असणार सहभाग

Pooja Dange

Bigg Boss OTT Season 2 Contestants Revealed : 'बिग बॉस ओटीटी'चा दुसरा सीझन १७ जूनपासून सुरू होणार आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये कोण दिसणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. काही सेलिब्रिटींची नावेही समोर आली आहेत. मात्र, निर्मात्यांनी ठोस काहीही सांगितले नाही.

पण आता अखेर 'बिग बॉस OTT 2' च्या निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांचा खुलासा केला आहे. स्पर्धकांचा चेहरा पूर्णपणे उघड झालेला नसून फक्त एक छोटीशी झलक दाखवली आहे. त्यासह प्रत्येक स्पर्धकाला एक खास नाव देण्यात आले आहे, ज्यावरून 'बिग बॉस OTT 2' मध्ये कोण असेल हे कळले आहे.

बिग बॉस OTT 2 मध्ये एकूण 12 स्पर्धक असतील, ज्यात टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. पाहूया या यादीत कोण-कोणाचा समावेश आहे ते. (Latest Entertainment News)

1. अविनाश सचदेव

'छोटी बहू' आणि 'इस प्यार को क्या नाम दूं'मधील अभिनेता अविनाश सचदेव. 'एक बार फिर'सारख्या टीव्ही शोमधून तो प्रसिद्ध झाला. 'छोटी बहू'मध्ये काम करताना तो को-स्टार आणि अभिनेत्री रुबिना दिलैकच्या प्रेमात पडला. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

यानंतर अविनाश सचदेवने को-स्टार शाल्मलीसोबत लग्न केले, पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अविनाश सचदेवच्या आयुष्यात पलक पुरस्वानी आली. पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि ब्रेकअप झाले. 'बिग बॉस OTT 2' साठी निर्मात्यांनी अविनाश सचदेवला 'हिरो नंबर वन' म्हणून नाव दिले आहे.

2. पलक पुरस्वानी

अविनाश सचदेवची गर्लफ्रेंड पलक पुरस्वानी देखील 'बिग बॉस OTT 2' ची स्पर्धक आहे. पलक एक मॉडेल आणि फॅशन डिझायनर देखील आहे. पलक पुरस्वानी स्प्लिट्सविला 7 मध्ये सहभागी झाली होती. नंतर तिने 'ये रिश्ते हैं प्यार के' आणि 'बडी देवरानी' सारखे टीव्ही शो केले.

3. आलिया

यावेळी 'बिग बॉस OTT 2' मध्ये, ज्या स्पर्धकावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत, ती म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया. आलिया आणि नवाजुद्दीनची कोर्टात केस सुरू आहे. आलियाने नवाजुद्दीनवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपासह अनेक आरोप करत त्याने घराबाहेर काढल्याचे सांगितले.आलिया 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये आली तर नक्कीच अनेक खुलासे होतील.

4. अभिषेक मल्हान

अभिषेक मल्हान एक लोकप्रिय YouTuber आहे आणि तो 'फुकरा इंसान' या नावाने प्रसिद्ध आहे. अभिषेक मल्हान मुंबईत आला आहे. त्याला भारताचा 'मिस्टर बीस्ट' म्हणतात. अभिषेक मल्हान हा दिल्लीतील पीतमपुरा-रोहिणी भागातील रहिवासी आहे. अभिषेक त्याच्या व्हिडिओंसाठी ओळखला जातो.

5. आकांक्षा पुरी

अभिनेत्री आकांक्षा पुरीला 'बिग बॉस'साठी अनेकवेळा ऑफर आल्या होत्या, पण आता ती 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी होणार आहे. आकांक्षा पुरी ही टीव्ही अभिनेत्री असून तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती पारस छाब्राला डेट करत होती. आता तिचे नाव मिका सिंगसोबत जोडले जात आहे. आकांक्षाची 'स्वयंवर: मिका दी वोटी'मध्ये गायक मिका सिंगची जोडीदार म्हणून निवड झाली होती.

6. जिया शंकर

जिया शंकर ही टीव्ही अभिनेत्री आहे. 'मेरी हनीकारक बीवी' मधील डॉ. इरावतीच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळाली. जिया शंकर नुकतीच रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटात दिसली होती. जिया शंकरने तिच्यात करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. तिने वेबसीरीजमध्येही काम केले आहे.

7. पुनित सुपरस्टार

अभिषेक मल्हान व्यतिरिक्त 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये आणखी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसणार आहे आणि तो म्हणजे पुनित सुपरस्टार. त्याचे नाव पुनीत कुमार असले तरी चाहते त्याला 'पुनीत सुपरस्टार' किंवा 'लॉर्ड पुनीत' या नावाने ओळखतात.

8. बेबिका धुर्वे

बेबिका धुर्वे ही एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि ती सध्या 'भाग्य लक्ष्मी' या टीव्ही शोमध्ये काम करत आहे. ती डेंटिस्ट देखील आहे. बेबिका धुर्वे 2020 मध्ये मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतही सहभागी झाली होती. बेबिका धुर्वे स्वतःला सलमान खानची खूप मोठी फॅन असल्याचे सांगते.

9. फलक नाझ

अभिनेत्री फलक नाझ देखील 'बिग बॉस OTT 2' चा भाग आहे. फलक नाझने अनेक टीव्ही शोमधून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र काही काळापासून ती भाऊ शीझान खानमुळे चर्चेत होती. को-स्टार तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शीझान खान महिनाभर तुरुंगात होता. कदाचित जेव्हा फलक बिग बॉसमध्ये येईल तेव्हा ती काही खुलासे करेल.

10. श्रुती सिन्हा

श्रुती सिन्हाही टीव्हीच्या दुनियेत प्रसिद्ध आहे. ती स्प्लिट्सविला 11 ची विजेती होती. याशिवाय ती 'रोडीज' आणि 'एस ऑफ स्पेस' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.

11. मनीषा राणी

मनीषा राणी मूळची बिहारची आहे आणि ती लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. मनीषा राणी कपिल शर्माच्या कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्येही दिसली होती. मनिषा राणी टिकटॉकवर लिप सिंक करून व्हिडिओ क्रिएट करायची तेव्हापासून ती प्रसिद्ध झाली. मनीषा राणी देखील एक YouTuber आहे.

12. जेद हदीद

जेद हदीद ही लेबनीज मॉडेल आहे. तो पूर्वी बेरूतमध्ये राहत होता, परंतु आता लंडनमध्ये राहतो. 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये जेदच्या एन्ट्रीमुळे किती उत्साह येतो हे पाहणे रंजक ठरेल.

13. केविन

केविन हा भारतीय खेळाडू आणि मिश्र मार्शल आर्टिस्ट आहे. तो 'रोडीज' आणि 'स्प्लिट्सविला' सारख्या शोचा भाग देखील होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT