Will Elvish Yadav Go To Bigg Boss 17 Instagram
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav: पुन्हा एकदा सिस्टम हँग होणार; Bigg Boss 17 मध्ये झळकणार एल्विश यादव ?

Will Elvish Yadav Go To Bigg Boss 17: एल्विश बिग बॉसच्या १७व्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Chetan Bodke

Elvish Yadav News

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवची प्रचंड चर्चा होते. एक प्रसिद्ध युट्यूबर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या एल्विशच्या फॅन लिस्टची कायमच चर्चा होते. यंदाच्या पर्वामध्ये एल्विशने एक वेगळाच विक्रम केला. वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये सहभागी झालेला एल्विश ‘बिग बॉस ओटीटी २’ची ट्रॉफी जिंकत एक वेगळा विक्रम स्वतःच्या नावावर केला. अशातच आता पुन्हा एकदा एल्विश बिग बॉसच्या १७व्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर, एल्विश यादवने ‘बिग बॉस १७’ मध्ये जाण्याबाबत स्वतः त्यानेच हिंट दिली आहे. एल्विश कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकताच एल्विशने शेअर केलेल्या नवीन ब्लॉगमध्ये, त्याच्या एका मित्राने त्याला ‘बिग बॉस १७’बद्दल काही प्रश्न विचारले आहेत. मित्राच्या उत्तरावर या युट्युबरने मजेशीर उत्तर दिलेय, तो म्हणतो, “सध्या मी याविषयी विचार करत आहे.” सध्या एल्विशचं हे उत्तर सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं आहे.

एल्विश त्याच्या शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये म्हणतो, “हो सध्या मी विचार करतोय, माझ्या चाहत्यांना मी एक क्लू देऊ का?, पण आपल्या युट्यूबरपैकी कोणाला तरी ‘बिग बॉस १७’मध्ये नक्की बोलवतील. जर मला ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा बोलावलं तर माझ्या चाहत्यांनो मी काय करू हे तुम्ही सांगा. तुम्हाला मी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये दिसायला पाहिजे की इतर कोणत्या शोमध्ये मला पाहायचं आहे? हे कृपया तुम्ही सांगा.” आता ‘बिग बॉस १७’मध्ये एल्विश यादव झळकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

EMI चा हप्ता थकवलात तर फोन होणार लॉक? आरबीआय नवा नियम आणणार, VIDEO

SCROLL FOR NEXT