Bebika Dhurve reveals why Salman is single  Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Updates : सलमान खानला प्रेमात मिळाला धोका ; बेबीका धुर्वेचा मोठा खुलासा

Salman Khan Marriage : मनीषाने बेबीकाच्या ज्योतिष ज्ञानाची परीक्षा घेतली आणि सलमान खान अजूनही सिंगल का आहे, असे विचारले.

Pooja Dange

Bebika Dhurve Reveals Why Salman is single : अभिनेत्री आणि ज्योतिषी बेबीका धुर्वेने 'बिग बॉस ओटीटी २'चा होस्ट अभिनेता सलमान खान अजूनही अविवाहित का आहे हे उघड केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात, फेस-रीडिंग सत्रात बेबीकाने अभिषेक मल्हान आणि जिया शंकर यांच्याशी भांडण केले. मनीषा राणी बेबीका आणि अभिषेकचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होती आणि दोघांमध्ये मध्यस्थी करत होती.

त्यानंतर मनीषाने बेबीकाला विचारले की जियाबद्दलची तिची भविष्यवाणी खरी ठरली का ? त्यावर बेबीका धुर्वेने स्पष्ट केले की तिची भविष्यवाणी कधीही चुकत नाही.

त्यानंतर मनीषाने बेबीकाच्या ज्योतिष ज्ञानाची परीक्षा घेतली आणि सलमान खान अजूनही सिंगल का आहे, असे विचारले. मनीषाने बेबीकाला विचारले, "त्याची फसवणूक झाली हे खरे आहे का?" यावर बेबीका लगेच म्हणाली, "हो खूप भयंकर फसवणूक झाली आहे." (Latest Entertainment News)

सलमान खान सिंगल का आहे हे देखील बेबीकाने सांगितले. "सलमानला एका घर सांभाळणारी मुलगी हवी आहे. तो दिसायला जरी रफ असला तरी तो आतून सॉफ्ट आहे. त्याला घराची काळजी घेणारी, आई-वडिलांची काळजी घेणारी व्यक्ती हवी आहे आणि तो घरी आल्यावर त्याच्या दोन चांगल्या गोष्टी बोलून त्याचा दिवसभराचा ताण दूर करेल.

गेल्या काही दिवसांपासून बेबीका, आलिया सिद्दीकी आणि आकांशा पुरीसह बीबी जेलमध्ये शिक्षा भोगत होत्या. घरातील सदस्यांसोबत फेस-रीडिंग सत्र आयोजित केल्यानंतर, बाबिकाला जेलमधून मुक्त करण्यात आले.

टास्क दरम्यान, बाबिका तिच्या कठोर शब्दात तिने अभिषेक मल्हानचा बदला घेतला. बाबिका म्हणाली की मल्हान हा बुद्धिमान कंटेंट क्रिएटर आहे, पण तो इतरांच्या कंटेंटची कॉपी करतो.

बेबीका म्हणाली की तिला अभिषेकला कानाखाली मारायचे होते. बेबीकाचे बोलणे ऐकून अभिषेकला राग आला आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. बेबीका गप्प राहणाऱ्यांमधील नाही. तिने देखील अभिषेकला भरपूर सुनावले.

अविनाश सचदेव, बेबीका धुर्वे, पलक पुरस्वानी आणि जिया शंकर हे या आठवड्यातील नॉमिनेशन लिस्टमध्ये आहेत. सीझनचा पहिला वीकेंड का वार शनिवारी म्हणजेच आज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT