Bigg Boss OTT 2 Aaliya Siddiqui Remember Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update: आलियाने बिग बॉसच्या घरात सांगितलं लव्हलाईफ, मिस्ट्री मॅनबद्दल म्हणते...

Aaliya Siddiqui Remembers Her Love Story: ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरातील सदस्यांसोबत आलियाने तिच्या लव्हलाईफबद्दल एक खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Bigg Boss OTT 2 Aaliya Siddiqui Remember Love Story: बिग बॉसचा ओटीटीचा नुकताच दुसरा सीझन सुरू झाला असून आलिया सिद्दीकी, पूजा भटसह अनेक स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. आलिया सिद्दीकी तिच्या खासगी आयुष्यातही चर्चेत होती. आलिया आणि नवाझुद्दिनमधील वाद हा सर्वश्रुत असून आलियाच्या आयुष्यात सध्या एका मिस्ट्री बॉयची एन्ट्री झाली.

आलियाच्या आयुष्यात आलेला तो मिस्ट्री मॅन नेमका कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घरात आलियाने एन्ट्री घेताच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच घरातील सदस्यांसोबत तिच्या लव्हलाईफबद्दलचा एक खुलासा केला.

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून आलिया एकदमच शांत दिसून येत आहे. नुकताच आलियाने तिच्या खासगी आयुष्यातील काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. यावेळी आलियाने नवाज सोबतच्या नात्यावर भाष्य केले आहे.

 ‘बिग बॉस ओटीटी २’च्या भागात, आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या प्रेमकहाणीबद्दल महत्वाचे भाष्य केले. सायरस ब्रोचासोबत अनुभव शेअर करताना अभिनेत्री म्हणते, “मी 2003 मध्ये नवाजला भेटली होती. तेव्हा नवाजचा भाऊ त्याचा असिस्टंट होता. मी पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना, मला हाकलून देण्यात आले होते. त्यावेळी नवाझुद्दिन आणि त्याचा भाऊ एकता नगरमध्ये राहत होता. त्यादरम्यान त्याच्या भावाने मला त्यांच्या एकता नगरमधील घरी राहण्यासाठी सांगितले. मी त्यांच्या घरात राहण्यासाठी कंफर्टेबल नव्हती. मी सर्वात आधी त्याचा फोटो पाहिला, पाहताच मी नवाजच्या प्रेमात पडले होते. मग मी त्याच्यासोबत राहू लागली.”

त्यानंतर सायरसने आलियाला तिच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅनबद्दल विचारले. यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, “माझ्या आयुष्यातील दुसरी व्यक्ती इटालियन आहे आणि तो खूपच सुंदर व्यक्ती आहे. यात शंका नाही. मी त्याला लाईक करते, ही गोष्ट त्याला सांगून दिली होती. त्यावेळी आमच्यात कोणते नाते देखील नव्हते. मी त्याला सांगितले की, मला त्याचे डोळे खूपच आवडले, हे सांगितल्यानंतर आम्ही बोलू लागलो. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिर आहे. तो नेहमीच कोणत्याही बाबतीत माझ्यासोबत असतो. तो मला प्रत्येक बाबतीत प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे मी १९ वर्षांनंतर रिलेशनशिप मध्ये राहण्याचा विचार केला.”

यावेळी सायरसने आलियाचा लग्नाबाबत देखील आत्मविश्वास वाढवला. सोबतच तिच्यासोबत बोलत असताना, तिला पुढे काही लग्नाचा काही विचार आहे का? असा देखील प्रश्न विचारला. यावर आलिया म्हणते, “नाही अरे. मी या जन्मी लग्न करणार नाही. आता माझा लग्नावरील विश्वास उडाला आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT