Bigg Boss Contestant Supporter Attack On Actress Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss: बिग बॉसच्या घरातील भांडण रस्त्यावर, हल्ल्यामध्ये अभिनेत्री गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

Bigg Boss Contestant Supporter Attack On Actress: बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका स्पर्धकाच्या सपोर्टरने अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला केला आहे.

Priya More

Tamil Bigg Boss 7:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉस (Bigg Boss) चांगलाच चर्चेत असतो. या शोमधील प्रत्येक स्पर्धक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अशामध्ये आता बिग बॉसशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एका स्पर्धकाच्या सपोर्टरने अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला केला आहे. या हल्ल्यात ही अभिनेत्री गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साऊथमधील तमिळ बिग बॉसशी संबंधित ही घटना आहे. हा शो साऊथ सुपरस्टार कमल हसन होस्ट करतात. तमिळ अभिनेत्री आणि माजी बिग बॉस तमिळ स्पर्धक वनिता विजयकुमारवर शनिवारी रात्री एका व्यक्तीने हल्ला केल्याची बातमी समोर आली. या बातमीची माहिती पोहचताच सर्वांना मोठा धक्का बसला. सध्या सुरू असलेल्या 'बिग बॉस तमिळ सीझन 7' मध्ये सहभागी झालेल्या अभिनेता प्रदीप अँटोनीला रेड कार्ड दाखविण्यास वनिताने समर्थन केले होते. यानंतर अभिनेत्रीवर हल्ला करण्यात आला असून हल्लेखोराने स्वत:ला प्रदीप अँटनी यांचा समर्थक असल्याचे सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वनिताने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. तिने या पोस्टमध्ये जखमी झालेला फोटो शेअर केला आहे. वनितावर झालेला हा हल्ला किती गंभीर होता हे तिच्या या फोटोवरून दिसून येत आहे.

तिने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'कमल हासन यांनी होस्ट केलेल्या रिअॅलिटी शोमधून प्रदीपला बाहेर काढण्यासाठी जेव्हा रेड कार्ड दाखवण्यात आले. तेव्हा मी त्याचे समर्थन केले. त्यानंतरच एका व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला.' 'वाझल' आणि 'अरुवी' या तमिळ चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेता प्रदीपला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या महिला स्पर्धकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले.

प्रदीपच्या हकालपट्टीनंतर तमिळ बिग बॉसबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. त्याच्या हकालपट्टीवरून सोशल मीडियावर लोकांमध्ये फूट पडली आहे. बिग बॉस 7 च्या या तामिळ सीझनमध्ये वनिताची मुलगी जोविका घरात आहे. त्यामुळे बिग बॉसच्या संदर्भात रोजच्या घडामोडींवर वनिता आपले मत व्यक्त करत असते. या संदर्भात, जेव्हा प्रदीपला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले तेव्हा वनिताने त्याचे समर्थन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT