Suraj Chavan Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Suraj Chavan Dance On Taambdi Chaambdi Song: सोशल मीडियावर सूरजने डान्सची व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय आहे. सूरज बिग बॉसच्या घरात असताना सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत होता. अशातच बिग बॉसच्या प्रवासानंतर सूरज चव्हाणची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. पुन्हा एकदा सूरज चव्हाण प्रेक्षकांची मने जिंकतोय. नुकतंच सोशल मीडियावर सूरजने डान्सची व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तांबडी चामडी गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने #गोलीगत, #झापूक झुपूक,#बिग बॉस #विनर #सूरज चव्हाण #धोका असे हॅशटॅग दिले आहेत. या गाण्यावरील त्याची हटके शैली पाहायला मिळत आहे. गाण्याचे बोल गात त्याने डान्स केला आहे. सूरजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चांगलीच पंसती दर्शवली आहे. सोशल मीडियावर सूरजचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सूरज चव्हाणच्या या ताबंडी चामडी गाण्यावरील व्हिडीओला मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सूरज बिग बॉसच्या घराज जाण्यापूर्वी देखील रिल्स, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला होता. सोशल मीडियावर तो ट्रेडिंग गाण्यावर रिल्स बनवून शेअर करत असायच्या. बिग बॉसच्या घरात अनेकदा त्याने सांगितलंय रिल्सच्या माध्यमातून मला लोकप्रियता मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT