Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Grand Finale: 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Manasvi Choudhary

बिग ?बॉस मराठी सीझन 5 चा महाअंतिम सोहळा आज होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यंदाच्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या 16 जणांपैकी सहा जण फायनलिस्ट ठरले आहेत. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट आहेत. हे स्पर्धक आता अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता या ६ जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाला २८ जुलैपासून सुरूवात झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा एकमेकांसोबतचा राडा, मैत्री, प्रेम असा खेळ पाहायला मिळाला. बिग बॉसच्या या सीझनमध्ये अनेक लक्षवेधी घटना घडल्या ज्यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला.

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा महाअंतिम सोहळा आज जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस यंदाच्या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता 'बिग बॉस मराठी'ची सांगता होताच 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवर भयंकर अपघात; कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, संजय लीला भन्साळी नुकसान भरपाई करणार

Rain Alert : मुंबईत अखेर मान्सूनचे दमदार आगमन, पुढील काही तास महत्त्वाचे; वाचा हवामानाचा अंदाज

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT