Jahnavi Killekar and chota pudhari ghanshyam darode Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: जान्हवी आणि घनःश्यामच्या वादाने गाठलंय टोक; काढतायत एकमेकांची अक्कल; पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi Day 38 : 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,"सगळ्यांना माहिती आहे, तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे.

Saam Tv

'बिग बॉस मराठी'च्या घरात काल नॉमिनेशन टास्क पार पडल्याने वातावरण तापलेलं आहे. नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आजच्या भागात जान्हवी आणि घन:श्यामच्या वादाने टोक गाठलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यांच्यातील वादामुळे इतर सदस्यांना मात्र काहीही फरक पडणार नाही आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये जान्हवी घन:श्यामसोबत वाद घालत म्हणत आहे,"सगळ्यांना माहिती आहे, तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे.

त्यावर घन:श्याम म्हणतो,"मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही". पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते,"अक्कल शून्य आहेस तू".

पॅडी दादा घेतायत सूरजची शिकवणी

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसणार आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तर नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते.

त्यामुळे सूरजला पॅडी दादा म्हणत आहेत,"अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस..तू तुझा निर्णय बदलायला नको होतास. अरबाजबद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते. गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं. प्रयत्न करणं सोडू नको".

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT