Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli- Arbaz Patel- 'तो त्याचा भूतकाळ... ' अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव न घेता निक्की स्पष्टच बोलली

Nikki Tamboli- Arbaz Patel Relation- बिग बॉस संपल्यानंतर निक्की आणि अरबाज लाईमलाईटमध्ये आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्कीने माध्यमांशी संवाद सांधला.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वातील स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली. बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्कीच्या नात्याची एकच चर्चा झाली. कधी भांडण तर कधी प्रेम करणारी ही जोडी बिग बॉस संपल्यानंतर देखील चर्चेत आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर निक्की आणि अरबाज एकमेकांना भेटतात.

बिग बॉस संपल्यानंतर निक्की आणि अरबाज लाईमलाईटमध्ये आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निक्कीने माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी निक्कीने अरबाजच्या नात्याविषयी सांगितले. ती म्हणाली,"असं काही नाही तो खूप चांगला आहे आणि खूप हार्डवर्किंग आहे. त्याचा जो भूतकाळ होता त्यावर आम्ही बोललोय. प्रत्येकाचा भूतकाळ असतो, माझाही भूतकाळ आहे."

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजच्या नात्याची चर्चा सुरू झाली. एकाच ग्रुपमधील या जोडीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र एकमेकांशी कायम सोबत असणारी ही जोडी चर्चेचा विषय ठरली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकत्र स्पॉट होताना दिसतेय. बिग बॉस’च्या घराबाहेरदेखील निक्की आणि अरबाज एकमेकांचा हातात हात घेऊन फिरताना दिसत आहेत. एवढंच नव्हेतर दोघं एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT