Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: आधी मैत्री, प्रेम आणि आता राडा; बिग बॉसच्या घरात अरबाज - निक्की पुन्हा आमने सामने

Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यात नव्या घडामोडी आणि वाद पाहायला मिळाले. याचदरम्यान बिग बॉसच्या घरात दोन गट पडले. याचदरम्यान मागील काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजच्या मैत्रीनंतर या दोघामध्ये प्रेमाचं नातं फुलणारं असं वाटत होतं अशातच आता बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

या प्रोमोमध्ये, निक्की आणि अरबाजमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसत आहे. या भांडणाचे कारण म्हणजे निक्कीला अभिजीतसोबत बघितल्यानंतर अरबाजला राग आला आहे. नवीन प्रोमोमध्ये, निक्की आणि अभिजीत एकत्र किचनमध्ये दिसत आहेत. दरम्यान निक्की हसते, हे पाहून अरबाज निक्कीला, "हसत आहेस" असं म्हणत भांडी जमिनीवर आदळतो. पुढे निक्की म्हणते, "काय हा याचा बालिशपणा."

पुढे अरबाज निक्कीला म्हणतो, तू मला अश्या वागण्याने हर्ट करतेस. यावर निक्की म्हणते की, तुला माझी गरज नाही आहे. यावर अरबाज म्हणतो, "नाही आहे ...." आता हे पाहून तर अजिबातच नाही. यावर निक्की म्हणते ," हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत..." यावरून निक्की आणि अभिजीत एकत्र हसतात,बोलतात आणि खेळतात हे सहन होत नाही यामुळे त्याला राग आल्याचं दिसत आहे.

निक्की आणि अभिजीत एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र हे अरबाजला पटत नाही. अरबाजने अनेकदा निक्कीला याबाबत सांगितलं आहे. मात्र निक्की ऐकायला तयार नाही. आता पु्न्हा निक्कीला अभिजीतसोबत बघितल्यानंतर अरबाज भडकला आहे. त्याने निक्कीसोबत कडाक्याचे भांडण केलं आहे. यानंतर आता पुढे काय होणार? रागातून अरबाजने बिग बॉसच्या घरात केलेली भाड्यांची तोडफोड यावर बिग बॉस काय अॅक्शन घेतील हे पाहणं महत्वाचं असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT