Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : 'भाऊचा धक्का'वर रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार, आज कोण होणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सध्या सोशल मीडियावर जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये स्पर्धकांची जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सध्या सोशल मीडियावर जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये स्पर्धकांची जोरदार चर्चा होत आहे. आज बिग बॉसच्या घरात 'भाऊचा धक्का' पार पडणार आहे. या सीझनमधील हा दुसरा 'भाऊचा धक्का' आहे. या एपिसोडमध्ये रितेश देशमुख कोणकोणत्या स्पर्धकांचे कान टोचणार ? कोणकोणात्या स्पर्धकाला कानमंत्र देणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

दुसऱ्या आठवड्यामध्ये स्पर्धकांमध्ये आपआपसात जोरदार राडे आणि आपआपसांतील वाद आपल्याला पाहायला मिळाला. याशिवाय दुसऱ्या आठवड्यात स्पर्धकामध्ये आपआपसात प्रेमाचे वारेही वाहताना आपल्याला दिसले. एकंदरितच या सर्वांची शाळा रितेश 'भाऊचा धक्का' मध्ये स्पर्धकांची घेणार आहे. शिवाय, कॅप्टन्सी टास्क दरम्यान झालेले वाद या सर्वांवर रितेश आज सर्वच स्पर्धकांची शाळा घेणार आहे.

नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर 'भाऊचा धक्का'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रितेश देशमुख म्हणतो, "आठवड्याभरात अनेकांचे डिसिजन्स चुकले, काही विनाकारण भांडले, काहींनी संधी मिळालेले डाव सोडले, या सर्वांवर करूयात टीका " यामध्ये, आर्या आणि निक्की, जान्हवी आणि सूरज, अरबाज आणि अभिजित यांच्यात झालेल्या वादाचे काही शॉर्ट्स पाहायला मिळत आहे. आजच्या 'भाऊचा धक्का'मध्ये रितेश देशमुख कोणाकोणाची शाळा घेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर झाली आहे. या आठवड्यात, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, निखिल दामले, घन:श्याम दराडे आणि पंढरीनाथ कांबळेला एलिमिनेट करण्यात आले आहे. आता या स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT