Bigg Boss Marathi 5 Promo Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : अखेर मुहूर्त ठरला! ‘बिग बॉस मराठी ५’च्या ग्रँड प्रिमियरची तारीख जाहीर, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू

Bigg Boss Marathi 5 Release Date Declared : अखेर ‘बिग बॉस मराठी ५’ची तारीख ठरली असून रितेश देशमुखचा नवा प्रोमो समोर आलाय.ढोलताशांच्या गजरात रितेशची धडाकेबाज एन्ट्री या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे.

Jyoti Shinde

'बिग बॉस मराठी ५'चे पर्व कधीपासून सुरू होणार? लाडक्या अभिनेत्याला बिग बॉस मराठी ५ चं होस्ट करताना कधीपासून पाहायला मिळणार? बिग बॉस मराठी ५ ची तारीख कधी जाहीर करणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहे. अखेर Bigg Boss Marathi 5 ची तारीख ठरली असून रितेश देशमुखचा नवा प्रोमो समोर आलाय.ढोलताशांच्या गजरात रितेशची धडाकेबाज एन्ट्री या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे प्रोमो पाहून सारेच म्हणतायत,"आररर खतरनाक".

सोशल मीडियावर भाऊचा कल्ला

प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार... पण जे वाईट वागणार त्यांची तो... एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार.. कारण रितेश भाऊ म्हणतोय,"मी येणार तर कल्ला होणारच". रितेश या प्रोमोमध्ये बेफाम होत ढोल वाजवतानाही दिसला.'बिग बॉस' प्रेमींना नाराज न करता रितेशने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीख सर्वांना सांगितली.

'या' तारखेपासून सुरू होणार'बिग बॉस मराठी ५'

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'BIGG BOSS Marathi'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे.

तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!!प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT