Bigg Boss Marathi 5 Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Contestant: वर्षा उसगांवकर ते सूरज चव्हाण; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात १६ स्पर्धकांची धमाकेदार एन्ट्री, वाचा कलाकारांची यादी

Bigg Boss Marathi 5 : २८ जुलैला म्हणजेच काल ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला. सगळ्या स्पर्धकांची यादीही समोर आली आहे.

Chetan Bodke

प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला. २८ जुलैला म्हणजेच काल ‘बिग बॉस मराठी’च्या ५ व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला. यावेळी प्रेक्षकांना या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक दिसणार याची प्रचंड उत्सुकता होती. शेवटी त्यावरील ही पडदा शेवटी उठला आहे. एकूण १६ स्पर्धकांनी घरात एन्ट्री घेतली असून अफलातून परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाची शान वाढवली.

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सरसह अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटी शोमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये वर्षा उसगांवकर, निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजित सावंत, घन: श्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील, धनंजय पोवार आणि गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण.... असे स्पर्धक बिग बॉसच्या प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

बिग बॉस मराठीचा हा सीझन सर्वांसाठीच खास असणार आहे. कारण, हा सीझन इतर सीझनपेक्षा फार वेगळा सीझन आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांना पैसे देऊन वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यांना पैसे नाही तर बिग बॉस करन्सीच्या माध्यमातून त्या वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. खरोखरंच हा सीझन इतर सीझन्सपेक्षा फार वेगळा असणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मिडिया एन्फ्लूएंसर, अनेक मराठमोळे सेलिब्रिटी आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्याला सीझनमध्ये खेळताना दिसणार आहेत.

हा खेळ १०० दिवस सुरू राहणार आहेत. या १०० दिवसांमध्ये घरातल्या स्पर्धकांमध्ये रूसवे- फुगवे, मैत्री, प्रेम आणि राडा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला ‘बिग बॉस मराठी ५’ दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT