Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Grand Celebration: ग्रँड सेलिब्रेशनमध्ये नेमकं असं काय घडलं? बिग बॉसने अंकिता अन् डीपी दादाला दिला धीर

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस' स्वत: सध्या घरातील प्रत्येक सदस्याचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहेत.

Manasvi Choudhary

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. सध्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नुकताच बिग बॉस मराठीचा आगामी प्रोमो रिलीज झाला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर... ही आहे महाराष्ट्र हार्टेड गर्ल..". तर डीपीबद्दल बोलताना बिग बॉस म्हणत आहेत,"या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं..या डीपीचा खेळ रंपाट होता...हा डीपीच झिंग झिंग झिंगाट होता".

'बिग बॉस' स्वत: सध्या घरातील प्रत्येक सदस्याचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहेत. बिग बॉसचा आजचा भाग अत्यंत खास असणार आहे. आता शेवटच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. येत्या काही दिवसांतच बिग बॉसचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरातील कोण जिंकणार याकडे सर्वंच प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT