Big Boss Marathi 5 Saam tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या; कोण होणार कॅप्टन

Bigg Boss Marathi New Season Day 20 : आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पार पडताना पाहायला मिळणार आहे. या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की आणि योगिता एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.

Saam Tv

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पार पडताना पाहायला मिळणार आहे. या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की आणि योगिता एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.

नॉमिनेशन टास्क असो वा कॅप्टनसीचा...

कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्कदरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहेत. आजच्या भागात टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसणार आहेत.

'बिग बॉस मराठी'चा आजचा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार असणार आहे. कोण होणार 'बिग बॉस मराठी'चा नवा कॅप्टन याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, बिग बॉस मराठी'च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT