Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीत बनला किंग खान

Bigg Boss Marathi New Promo: बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना अभिनयाचा फिवर. प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये अभिजीत सावंत शाहरुख खानची मिमिक्री करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेक्षकांना आज मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सूरांचा बादशाह असणारा अभिजीत सावंत 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मिमिक्री करताना दिसून येईल. त्यामुळे त्याची मिमिक्री पाहताना प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरामध्ये अनेक राडे पाहायला मिळाले. तर काही सदस्यांचं हळवं रुप पाहायला मिळालं. वैभवच्या जाण्यामुळे जान्हवी एकटी पडली होती. तिला बिग बॉसने कनफेशन रुममध्ये बोलवून प्रोत्साहन दिल आणि पुढील खेळांसाठी शुभेच्छा दिल्या.

'वरण-भात बनवताना अभिजीत सावंत शाहरुख खानची मिमिक्री करताना दिसून येईल. आजच्या भागात सूरज अभिजीतला म्हणतोय,"आज तू शाहरुख खान झाला आहेस. शाहरुख खान तुम्ही आज काय बनवताय?". त्यावर शाहरुखच्या स्टाईलमध्ये अभिजीत म्हणतो,"डाल-राईस. एकदम मस्त खिचडी बन रही है. बहोतही बढिया लग रही है. यए खिचडी मेरे दिल के बहोत करिब है".

अभिजीतच्या मिमिक्रीनंतर सूरज आणि वर्षा ताई टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन देतात. अभिजीतच्या रुपाने 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज शाहरुख खान अवतरणार आहे. अभिजीतने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह टास्कमध्ये कंटाळलेल्या सदस्यांचंदेखील मनोरंजन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT