Varsha Usgaonkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 5 : प्राणायाम, योगासनं अन्... 'हे' आहे वर्षा ताईंच्या सौंदर्याचं रहस्य

Bigg Boss Marathi New Season Day 38 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे.

Saam Tv

'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. वर्षा ताई कॅप्टन झाल्यामुळे कॅरामल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

वर्षा ताईंच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळचं तेज आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा ताईंनी याबद्दल भाष्य केलं आहे.

वर्षा ताई कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणत आहेत,"आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय".

कॅरामल कस्टर्ड खात वर्षा ताई पुढे म्हणत आहेत,"आता तुम्हाला कळलचं असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे".

घरात रंगली घन:श्यामच्या आक्रमकपणावर चर्चा

आज UNSEEN UNDEKHA मध्ये अंकिता, अभिजीत आणि पॅडी दादा आक्रमक घन:श्यामवर चर्चा करताना दिसत आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,"घन:श्यामचं कठीण आहे. त्यांच्या लोकांमध्येही सतत त्याचं वाजत असतं". यावर अंकिता म्हणते,"त्याला बोलण्याची शिस्त नाही, तो त्याच्या मतांवर ठाम नाही". अभिजीत म्हणतो,"घन:श्याम अग्रेसिव्ह आर्या आहे. काही बोलायला गेलो की तो वाकड्यातच जातो. त्याला कॅमेरा पहिला हवा असतो". त्यावर अंकिता म्हणते,"हुशार आहे तो".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT