Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'चं घर आहे की कुस्तीच्या आखाडा? अरबाज आणि संग्राममध्ये ताकदीचा सामना

Arbaaz-Sangram Fight : 'बिग बॉस मराठी' मध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्रामने देखील आपला गेम दाखवायला सुरूवात केली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अजूनच मनोरंजक होत आहे. प्रत्येक दिवशी नवीन खेळ पाहायला मिळत आहे. या आठवड्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या संग्रामने देखील आपला गेमदाखवायाला सुरुवात केली आहे. आपल्याला अरबाज आणि संग्राममध्ये (Sangram Chougule ) टास्क दरम्यान झालेली धक्काबुक्की पाहायला मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात घन:श्याम दराडे घराबाहेर पडला. तर या आठवड्यात सूरज हा कॅप्टन आहे. संग्राम चौगुलेच्या एन्ट्री नंतर बिग बॉस घरात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. संग्राम आल्यापासूनच अरबाज आणि निक्कीच्या विरोधात जात आहे. तर अरबाज-निक्की देखील संग्रामवर टीका-टिप्पणी करताना पाहायला मिळत आहे. घरात नव्या आठवड्यासाठी कॅप्टन्सीचा टास्क रंगला आहे. ज्यात संग्राम आणि अरबाजचं रौद्र रूप पाहायला मिळाले आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात संग्राम आणि अरबाजमध्ये जोरदार भांडण होणार आहे. अरबाज आणि संग्राम आमनेसामने येणार आहेत. नुकताच शेअर झालेल्या 'बिग बॉस मराठी' च्या प्रोमोमध्ये अरबाज (Arbaaz Patel) आणि संग्राम राडा घालताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या राड्याची तीव्रतेने बिग बॉस कुस्तीच्या आखाडा रूपांतरित झाला आहे. या दोघांमुळे घरातील वातावरण देखील खराब झालेले पाहायला मिळत आहे. बाहेर जाऊन ताकद दाखव असे संग्राम अरबाजला बोलतो. व्हिडिओ निक्की अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येताना पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात सहा सदस्य नोमिनेट झाले आहेत. यातील कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT