Bigg Boss Daily Task Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4: 'कॅमेरा बघतोय लाज बाळगा'; टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये जोरदार राडा

बिग बॉसच्या चौथ्या सीझनची सुरुवात होऊन नुकतेच काही दिवस झाले असून घरात भांडणाचे विस्फोट होताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉसच्या चौथ्या सीझनची सुरुवात होऊन नुकतेच काही दिवस झाले असून घरात भांडणाचे विस्फोट होताना दिसत आहेत. बिग बॉस खेळाडूंना (Player) नवनवीन टास्क देत असतात. ते टास्क सर्व सदस्यांना एकत्र येत पूर्ण करायचे असतात, त्यात काही स्पर्धकांची मैत्री चांगली होते तर काही खेळाडूंमध्ये बिनसतं. घरात पहिल्याच दिवसापासून भांडणाचे विस्फोट होताना दिसत आहेत. महेश मांजरेकरांनी स्पर्धकांचे कान टोचल्यानंतर खेळात All Is Well दिसत आहे. नक्कीच बिग बॉसचे चौथे पर्व चांगलेच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या राड्याचे आता स्वरुप बदलले आहे. (Entertainment)

या पर्वात स्पर्धकांमधील भांडणाची पद्धत बदललेली दिसत आहे. या पर्वात बरेच स्पर्धक एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडिओ पाहताच नक्कीच आपल्याला वाटेल की, या पर्वापासून स्पर्धकांमधील भांडणाची पद्धत बदलली आहे. बिग बॉसने घरातील दिलेल्या टास्कदरम्यान एकमेकांमध्ये काही कारणांवरुन खटके उडताना दिसत आहेत.

नवनव्या टास्कचा सामना करावा लागणाऱ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा नवा टास्क समोर आला आहे. घरातील गार्डन परिसरात विमानतळ तयार करण्यात आले आहे. टास्कदरम्यान खेळात स्पर्धकांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगताना दिसत आहे. टास्कदरम्यान किरण मानेंची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. “कॅमेरा बघतोय लाज बाळगा.” असे किरण माने त्या व्हिडीओत बोलत आहेत. तसेच “दात पाडेन” असे वेगवेगळे संवाद स्पर्धकांच्या तोंडी ऐकायला मिळत आहेत. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये जबरदस्त भांडण होणार असल्याचे दिसत आहे.

याआधी अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेमध्ये एकेरी भाषेत भांडण होताना दिसले. आणखी काय काय बिग बॉसच्या घरात रंजक गोष्टी पाहायला मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT