Bigg Boss Daily Update Instagram/ @bbmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 4: बिग बॉसच्या घरात अक्षय आणि तेजस्विनीची जुळली 'रेशीमगाठ', पाहा व्हिडिओ...

अक्षय आणि तेजस्विनी या दोघांना एक टास्क देण्यात आला आहे. तो टास्क ते एकत्र खेळताना दिसत आहे. यावेळी ते एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Daily Update: वादळी सुरुवात झालेल्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला आता १५ दिवसांहून अधिक काळ लोटतोय. आत्तापर्यंत प्रत्येक स्पर्धकाचे नवनवे चेहरे आपल्यासमोर येऊन गेले आहेत. सर्वच स्पर्धक आपल्या खुमासदार शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला प्रेक्षकही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देत आहे.

प्रत्येक आठवड्यात घरामध्ये नवनवे ट्विस्ट आणि काही तरी नवीन गोष्ट आपल्याला दिसत आहे. कोणाची मैत्री चांगलीच घट्ट होत आहे तर कोणाचे जुने प्रेम मिळत आहे. बिग बॉसच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरुन असे दिसत आहे की, घरातील वातावरण पुन्हा एकदा गुलाबी होणार आहे. (Bigg Boss)

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे (Bigg Boss Marathi). त्यात अक्षय आणि तेजस्विनी या दोघांना एक टास्क देण्यात आला आहे. तो टास्क ते एकत्र खेळताना दिसत आहे. यावेळी ते एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहे. तेवढ्यात अक्षय म्हणतो, आणि अशाप्रकारे मला माझा पार्टनर मिळाला. मी तुझा बाजीराव आणि तु माझी मस्तानी.

यावर तेजस्विनी म्हणते, खरच तू माझ्या प्रेमात पडशील हा. अक्षय आणि तेजस्विनीच्या या जोडीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांच्या मनात सध्या एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे, 'या दोघांच्या ही प्रेमाचा गुलमोहर फुलतोय की काय? '

या दोघांच्याही व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भरपूर कमेंट्स येत आहे. त्यामुळे नक्की बिग बॉसच्या घरात काय घडतंय हे येत्या भागातच कळेल. यामुळे घरात नवीन काय वाद होणार किंवा काय रंजक होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये रंजक होत असल्याचे दिसत आहे. कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी नेणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT