Bigg Boss Marathi Latest Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Martahi 4: अमृता- अक्षयचा पुन्हा वाद चिघळला, दोघांमध्ये जबरदस्त खडाजंगी

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर मध्ये मेकअप बॉक्स वरून मोठा राडा झाला आहे. अमृता आणि अक्षय मध्ये मेकअप बॉक्सवरून चांगलाच वाद होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Martahi 4: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे 'बिग बॉस.' हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसही तेवढेच चर्चेत आहे. मराठी बिग बॉसचा प्रत्येक सीझन वादळी ठरला आहे. तसाच बीग बॉसच्या ४ सीझनही जोरदार चर्चेत आहे. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकामुळे दिवसाची रंगत वाढत आहे. बिग बॉसच्या घरात शारीरिक नाही बौद्धिक आणि भावनिक कुस्ती खेळली जाते. बिग बॉस जेव्हा टास्क देतात त्यावेळी स्पर्धकांना शारीरिक कुस्तीसोबत बौद्धिक कुस्तीही तिथे खेळली जाते.

बिग बॉस देत असलेल्या खेळात प्रत्येक स्पर्धक आपली वेगळी खेळी खेळत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. बिग बॉसच्या घरात कोणते नाते कधी संपेल याची खात्री कोणालाच देता येत नाही. वाईल्ड कार्डमध्ये एन्ट्री मिळालेल्या स्नेहलताने नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना नाराज केले आहे. चार आठवड्यांनंतर प्रेक्षकही स्पर्धकांना चांगलेच ओळखू लागले आहेत. सध्या घरात "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर मध्ये मेकअप बॉक्स वरून मोठा राडा झाला आहे. अमृता आणि अक्षय मध्ये मेकअप बॉक्सवरून चांगलाच वाद होणार आहे. अमृताने अक्षयला बजावून सांगितले पाय नको मारुस मेकअप आहे माझा...अक्षय म्हणाला, पाय मुद्दाम मारला का तुझ्या मेकअपला ?

अमृता म्हणाली, मी सांगून देखील पाय अजून तिथेच आहे तुझा? अक्षयचे यावर म्हणणे आहे मी मुद्दाम मारला का? पाय मारला हे वाक्य म्हणू नकोस ... अमृता म्हणाली, मग काय म्हणू ? दुसरं वाक्य काय आहे ? अक्षय म्हणाला, पाय लागला असं म्हण... तुझ्यासारखा मूर्ख आहे का मी? चिटर कुठली रडी... आणि हे भांडणं असच सुरू राहिले...

अमृता म्हणाली, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. अक्षय म्हणाला, तेच म्हणणं आहे खूप फरक आहे आपल्यात म्हणूनच तुझ्याशी वाद नाही घालतं आहे. आजच्या भागामध्ये अक्षय आणि अमृताचे बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण वाजले आहे. मेकअप बॉक्स वरील हे भांडण कितीवेळ लांबले जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT