Bigg Boss Marathi Latest Photo Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री कोणाची' स्पर्धकांसह साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला

'बिग बॉस मराठी'च्या घरात आणखीन नवं वादळ निर्माण करायला पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या मराठीच्या घरातील रोज काही तरी रंजक पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून बिग बॉसच्या घरात कोणत्या ना कोणत्या तरी विषयावरुन भांडण होत असतात. त्यामुळे कधी घरात तंटामुक्ती वातावरण तर कधी चिडचिड करणारे वातावरण घरात असयाचे.

बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन स्पर्धकांना घराबाहेर जावे लागले आहे. त्यात पहिला स्पर्धक डॉ. निखिल राजेशिर्के तर दुसऱ्या आठवड्यात घुंगराच्या तालावर अख्ख्या महाराष्ट्राला नाचवणाऱ्या लावणी क्विन मेघा घाडगे ला घराबाहेर जावे लागले.

बिगबॉसच्या घरात दिवसेंदिवस मैत्री आणि प्रेमाची समीकरणे खूपच बदलत आहेत. काहींना खेळ खेळायला चांगलाच जोर आलाय तर काहींना झोपेतून जागे करण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या खेळावरुन बिग बॉस सर्वांचीच गोड तिखट शब्दातून चावडीवर हजेरी घेतात. आजच्या भागात 'वाईल्ड कार्ड' नावाच्या रुपाने वादळ येणार आहे.

तिसरा आठवडा तसा बराच चर्चीत होता, टास्क आणि वादविवादात दोन गट झालेले ही दिसले. त्यांची स्पर्धा आणखीनच वाढवायला दरवर्षीप्रमाणे यंदाही शोच्या मध्यात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. या सर्वांना शेराला सव्वा शेर म्हणून एन्ट्री घेणारी स्पर्धक काय घोळ घालणार हे पुढच्या दिवसांमध्येच कळेल.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. ही एक महिला स्पर्धक असून हिच्या मादक पद्धतीच्या डान्स स्टाईलने घरातील सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान काही नेटकरी या स्पर्धकाच्या नावाचा अंदाज बांधत आहेत.

काहींचं म्हणणं आहे की, ही वाईल्ड कार्ड स्पर्धक 'फुलाला सुगंध मातीचा' फेम ऐश्वर्या शेटे असू शकते. तर काहींनी तेजश्री जाधवचं नाव घेतलं आहे. तर एकाने शिवानी बावकरचं नाव घेतलं आहे. परंतु आता ही वाईल्ड कार्ड एन्ट्री नेमकी कोण आहे हे आजच्या भागात समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT