Bigg Boss Marathi Latest Update  Instagram/ @bbmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: मेघा घराबाहेर जाताना 'या' स्पर्धकांवर बरसली, जाता स्पर्धकांची पोलखोल

योगेशचा राग अनावर झाल्यानं त्यानं सदस्यांचा बाप काढला. यावरून मेघा आणि योगेशमध्ये चांगलीच जुंपली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Daily Update: सध्या बराच चर्चेत असलेला बिग बॉसच्या चौथ्या सीजनची स्पर्धकांसह प्रेक्षक चांगलेच आनंद लुटत आहे. तब्बल तीन आठवडे एकत्र घरात राहिल्यानंतर प्रत्येकासोबत नाते चांगलेच घट्ट होताना दिसत आहे. पण बिग बॉस (Bigg Boss) प्रत्येक आठवड्यात देत असलेल्या टास्कमध्ये प्रत्येकाचे चांगलेच भांडण होत आहे. त्यामुळे ते बरेच चर्चेत असतात. या रविवारी बिग बॉसमधील एका स्पर्धकाला कायमचे घराबाहेर जावे लागले आहे. त्या स्पर्धकाचे नाव आहे, 'मेघा घाडगे'. (Bigg Boss Marathi)

किरण माने, (Kiran Mane) अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि मेघा यांच्यातून मेघा घाडगेला कमी वोट मिळाल्याने मेघा घराबाहेर पडली. मेघाने घराबाहेर जाताना किरण माने सह योगेश जाधवचे ही महत्वाचे खुलासे केले आहे. घराबाहेर जाता जाता तिने सर्वांच्या समोर योगेशचा खरा चेहरा आणलाय असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

तिसऱ्या आठवड्यात योगेश आणि मेघामध्ये (Megha Ghadge) कॅप्टनसीचा टास्क करताना शाब्दिक चकमक झाली. योगेशचा राग अनावर झाल्यानं त्यानं सदस्यांचा बाप काढला. यावरून मेघा आणि योगेशमध्ये चांगलीच जुंपली. एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना मेघानं योगेशचं सत्य बाहेर आणलं आहे.

यावेळी तिने बिग बॉसच्या घरात झालेल्या अर्ध्या गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवण्यात आल्या नाही असेही म्हणाली. सोबतच ती पुढे बोलते, त्याचा तोंडावर कोणाचाही लगाम नाही. नेहमीच मी त्याला सावरत आली आहे. तू जे काही बोलतोस ते सर्वच ऐकून घेणार नाहीत. क्वचितच असे व्यक्ती असतील ते ऐकून घेतील. तू बोलतोस त्याने प्रत्येकाच्या मनावर वेगळा परिणाम होतो, त्यामुळे बोलताना जरा सावध राहा.

बऱ्याचदा योगेश प्रत्येक गोष्टीची तुलना पैशांसोबत करायचा. दरवेळी ताई पैसे पाहिजेत का?, नाचून दाखवता का?, हे बोलणं बरोबर होत का? ताई मी पैसे देतो हे करून दाखवणार का? एकदा त्याने असे म्हंटले होते की, ताई मला 1 लाख रूपये द्या मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. असं बऱ्याचदा चालले होते. मी त्याला एकदा बोलली, योग्या भूक लागली आहे पण अजून जेवण तयार नाहीये. तेव्हा मला म्हणाला होता की, भूक ना मग कुत्र्यासारखं. त्याच्या अशा वागण्याने सर्वच हर्ट व्हायचे.

तो प्रत्येकाला बापावरून बोलण्यावरून महेश मांजरेकरांनी ही चांगलेच सुनावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT