Bigg Boss Marathi Daily Update Instagram/ @bbmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात धक्काबुक्की; दोन स्पर्धकांमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

प्रोमोमध्ये सर्व स्पर्धकांमध्ये चांगलेच जुंपल्याचे दिसत आहे. दरम्यान घरातील स्पर्धक बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करत असून यावेळी चांगलाच गोंधळ उडालेला दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बिग बॉसच्या घरात रविवारी पहिले नॉमिनेशन कार्य पार पडले (Bigg Boss). यावेळी बिग बॉसच्या घरातून डॉ. निखिल राजेशिर्केला घराबाहेर जावे लागले होते. पहिल्या दिवसापासून सुरु झालेला वाद हा मधल्या काही दिवसात सर्वच स्पर्धक विसरले होते. पण पहिले नॉमिनेशन कार्य पूर्ण झाल्यापासून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. चावडीवर महेश मांजरेकरांनी काही स्पर्धक चांगले खेळतात म्हणून त्यांची पाठ थोपटली तर काही स्पर्धक घरात नेहमी वाद घालतात म्हणून त्यांचे कान टोचले.

पहिल्यापासूनच बिग बॉस या रिअॅलिटी शोला 'वादांसाठी प्रसिद्ध' असल्याची ओळख मिळाली आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्या शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सर्व स्पर्धकांमध्ये चांगलेच जुंपल्याचे दिसत आहे. दरम्यान घरातील स्पर्धक बिग बॉसने दिलेला टास्क पूर्ण करत असून यावेळी चांगलाच गोंधळ उडालेला दिसला. हा गोंधळ तेजस्विनी आणि अक्षय केळकर यांच्यात झाला. या भांडणात योगेश जाधवनेही उडी घेतली आहे. (Bigg Boss Marathi) (Marathi Entertainment News)

टास्कदरम्यान अक्षय मुलींच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. त्या मुद्द्यावरुनच तेजस्विनी आणि अक्षयच्या अंगावर धावून जाते. अक्षय आणि तेजस्विनी या दोघांमध्येही कोणत्या टास्कवरुन वाद होतो, हे आजच्या भागातच कळणार आहे. टास्कदरम्यान बिग बॉस स्पर्धकांना काय बोलणार हे आजच्या भागातच कळेल.

काल बिग बॉसच्या घरात प्रसाद आणि योगेश या दोघांमध्ये आपण जुंपलेली पाहिली. यावेळी प्रसाद योगेशला सांगतो की, 'तुझा ग्रुप असेल तर तो घेऊन तू बाजूला जा. मी काही तुला घाबरत नाही. तू आधी स्वत:चा स्टँड घे.' दरम्यान योगेश त्याला सांगतो की शांत होऊन बोल. पण त्यानंतर प्रसादने योगेशला 'चल निघ तू' म्हटल्यावर योगेशचाही पारा चढतो.

तो त्याच्याकडे धावत घेत सगळे स्पर्धक या दोघांनाही सावरायचे प्रयत्न करतात. यावेळी कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कोण कोणाला नॉमिनेट करणार? कोण कोणाला सेफ करणार ? कोणता स्पर्धक कायमचा घराबाहेर जाणार? या सर्वांची उत्तरे आज कळणार आहेत. सध्या या प्रोमोनं साऱ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chutney Recipes: 2025 मध्ये जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या 5 चटण्या, नवीन वर्ष सुरू होण्याआधी नक्की ट्राय करा

Shocking : पीजीमध्ये राहणारी तरुणी दारू पिऊन आली, घरमालकाने तिच्यासोबत केलं भयंकर कृत्य; पुण्यात खळबळ

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT