Bigg Boss Marathi Suraj Chavan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सूरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्ये यांनी केली भविष्यवाणी

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये, सुरूवातील बिग बॉसच्या घरातील सर्वजण राशीचक्राकर शरद उपाध्ये यांचे स्वागत करत आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अंतिम टप्प्यात बिग बॉसच्या घरात नवं समीकरण सुरू आहे. सध्या बिग बॉस मराठीचा ९ वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध राशीचक्राकर शरद उपाध्ये यांनी उपस्थिती लावली आहे. आता आठवड्याचा Extra कल्ला मध्ये ते नक्कीच ते पाहायला मिळणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये, सुरूवातील बिग बॉसच्या घरातील सर्वजण राशीचक्राकर शरद उपाध्ये यांचे स्वागत करत आहेत. यानंतर सर्व मंडळी त्यांना भविष्याबद्दल विचारत आहे. दरम्यान, पंढरीनाथ त्यांना विचारतो की, सूरज यांचं लग्न ठरत नाहीये. यांच्या लग्नाचा नेमका योग कधी आहे? यावर शरद उपाध्ये मजेशीर उत्तर देतात.

आजच्या भागात राशीचक्रकार शरद उपाध्ये या आठवड्याचा Extra कल्ला करणार आहेत. हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरात राखी सांवत आणि अभिजीत बिचकुलेची देखील एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ महाअंतिम फेरीला काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आहे. त्यामुळे आता अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर या सदस्यांमधून कोण विजेता होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT