Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : कोणाला मिळणार जादुई दिव्याची Immunity? बिग बॉस घरात रंगणार नॉमिनेशन टास्क

Bigg Boss Marathi Nomination Task : 'बिग बॉस मराठी' मध्ये या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Shreya Maskar

दिवसेंदिवस बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) खेळ रंगत चाला आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळत आहे. प्रत्येकाचा गेम प्लान येथे पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सूरज कॅप्टनपदी बहुमताने विराजमान झाला आहे. संग्रामच्या येण्याने 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवीन राडा पाहायला मिळत आहे. संग्रामने निक्की आणि अरबाजला हलक्यात घेतल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क (NominationTask) पार पडणार आहे. या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

'बिग बॉस मराठी' चा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरात नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसत आहे. हा जादुई दिव्याचा टास्क घरात कोणती नवीन जादू करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. आता घरात आपल्याला नवीन राडा पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी अरबाजला (Arbaz Patel) नॉमिनेट न करण्यासाठी विनंती केलेली पाहायला मिळाली आहे. तर अंकिता (Ankita Walawalkar) जान्हवीला सरळ नॉमिनेट करते. हा निर्णय जान्हवीला न पटल्यामुळे ती घरात राडा घालते.

बिग बॉस घरात अरबाजच्या कॅप्टन्सी वरून चर्चा होताना आज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात पॅडी, डीपी, अंकिता आणि संग्राम अरबाजची फिरकी घेताना दिसणार आहेत. संग्राम मस्करीत अरबाजला बोलतो की, "याला म्हणतात पायावर दगड नाही तर दगडावर पाय मारणं." हा आठवडा प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT