Bigg Boss Marathi Winner  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Finale: फायनलला कोण जाणार? बिग बॉसच्या घरात शरद उपाध्याय यांनी सागितलं भविष्य

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'चे सीझन ५ संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा 'ग्रँड फिनाले' कार्यक्रम आहे. १०० दिवसांचा हा खेळ यंदा ७० दिवसांतच संपणार आहे. यामुळे आता बिग बॉसच्या घरात विजय कोण होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉसच्या घरात आता शेवटच्या टप्प्यात नव समीकरण सुरू आहे. नुकतंच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात लोकप्रिय राशीचक्रकार शरद उपाध्याय याची एन्ट्री झाली आहे. यामुळेच बिग बॉसच्या घरात सर्वांचीच भविष्यवाणी सुरू आहे. सुरुवातीला बिग बॉसच्या घरातील सर्वच शरद उपाध्येंचं स्वागत करत आहेत. त्यानंतर पंढरीनाथ त्यांना प्रश्न विचारतो की, सूरज यांचं लग्न ठरत नाहीये. यांच्या लग्नाचा नेमका कधी योग्य आहे? त्यावर शरद उपाध्ये मजेशीर उत्तर देतात. ते म्हणतात की, मी मुलगी असतो तर यांना सोडलं नसतं. त्यानंतर पंढरीनाथ पुढे विचारतो, फायनलपर्यंत कोणती रास जाईल? तेव्हा शरद उपाध्ये म्हणतात, “बिग बॉस मला केव्हातरी आपली रास जाणून घ्यायची आहे.”

आजच्या भागात राशीचक्रकार शरद उपाध्ये या आठवड्याचा Extra कल्ला करणार आहेत. हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरात राखी सांवत आणि अभिजीत बिचकुलेची देखील एन्ट्री झाली आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ महाअंतिम फेरीला काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आहे. त्यामुळे आता अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर या सदस्यांमधून कोण विजेता होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election commission PC : राज्यात कधी जाहीर होणार निवडणूक, महिला - नवमतदारांची संख्या किती? निवडणूक आयुक्तांच्या PC चे महत्त्वाचे मुद्दे

Plastic Rice : तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ? काँग्रेस खासदारांच्या दाव्याने खळबळ, तथ्य काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Senate Election : मुलाचं कौतुक, आईला अप्रुप; सिनेटचा विजयानंतर मातोश्रीवर भावनेचा पूर, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार? 1 ऑक्टोबरला 'घड्याळ'चा फैसला?

Maharashtra Politics : दिघेंच्या मृत्यूवरुन पुन्हा रंगलं राजकारण; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ, नेमका काय केला आरोप? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT