Bigg Boss Marathi 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: 'यांच्यात तर नुसतं गुलूगुलू चालतं...'; निक्की अन् अरबाजबद्दल अभिजीत स्पष्टचं बोलला!

Abhijeet And Paddy: पॅडी आणि संग्राम यांच्यात यंदाच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 चा आठवा आठवडा सुरू आहे. मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून आर्या आणि वैभव बाहेर पडले आहेत. अशातच बिग बॉसच्या घरातली खेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडलं.

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात दोन टिम पडल्या आहेत. टीम A मध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज होते. तर टीम B मध्ये अभिजीत, अंकिता, पॅडी, धनंजय आणि संग्राम होते. दरम्यान दोन्ही टीमना नॉमिनेशनासाठी जंगलराज हा नवीन टास्क देण्यात आला होता. जंगलराज या नॉमिनेशन टास्कमध्ये शिकाऱ्याची बंदूक जो आणेल ती टीम यशस्वी होईल असं सांगण्यात आलं होतं. या नॉमिनेशन टास्कमध्ये टीम B विजयी झाली. तर टीम A मधील निक्की, अरबाज,जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे स्पर्धक नॉमिनेट झाले.

नुकतंच कलर्स मराठीवर नवीन एपिसोड रिलीज झाला आहे. यामध्ये पॅडी आणि संग्राम यांच्यात यंदाच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान अभिजीत पॅडीला म्हणतो, "यावेळी अरबाज जाऊ शकतो " त्यावर संग्राम म्हणतो निक्की काय करेल?" त्यावर अभिजीत म्हणतो, आता तर गुलूगुलू मध्ये सगळं संपतं. पॅडीही त्याला साथ देत अर्धा वेळच त्याच्यात जातो. असं म्हणतो. पुढे अभिजीत म्हणतो, "तो पण त्या टास्कसाठी येतो. एकदा टास्क झाला की तो परत आपल्या गुहेत जातो.. तो सिंह कसा असायचा. शिकारीला जात नाय तो शिकार सिंहि‍णी करतात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT