Bigg Boss Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Video: बिग बॉस च्या घरात पार पडणार जंगलराज टास्क; बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?

Bigg Boss New Task Video: , 'बिग बॉस मराठी'च्या घरावर या आठवड्यात जंगलराज टास्क पार पडणार आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या घरात दर आठवड्याला वेगवेगळे टास्क पार पडत आहेत. प्रत्येक टास्कमध्ये सदस्य मजा करण्यासोबत राडा आणि धुमाकूळ घालताना दिसत आहे. पण आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात जंगलराज असलेलं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा टास्क आहे.

प्रोमोमध्ये, 'बिग बॉस मराठी'च्या घरावर या आठवड्यात जंगलराज असणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होईल. टास्कमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,"आपल्याला ते षडयंत्र वापरावं लागेल". तर अरबाज म्हणतोय,"काहीही करा लीड आपल्याला करायचं आहे". निक्की म्हणतेय,"टीम वाटलीच पाहिजे". प्रोमोमध्ये शेवटी जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.'बिग बॉस मराठी'च्या घरात पार पडणाऱ्या जंगलराजमध्ये कोण राज्य करणार आणि कोण बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी? हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.

आजच्या भागात अभिजीत डीपी दादांना अंकितासोबत काय वाकडं झालंय का हे विचारताना दिसणार आहे. त्यावर उत्तर देत डीपी दादा म्हणतात,"बास झालं.. जवळीक एका मर्यादेपर्यंतच बरी. जिथे मला वाटेल अडचणीत आहे तिथे मी उभा राहणार. बाकीवेळेस माझ्याकडून तू अपेक्षा करू नकोस. पुस्तकाची पाने भरपूर आहेत. तुम्ही उजव्या बाजूचीच पाहत आहात. डाव्या बाजूलाही लेखकाने कष्ट घेतले आहेत. तुम्हाला उजव्या पाणावर लिहायला जी मजा येत आहे ती डाव्या पानावर येत नाही. पण नंतर डाव्या पाणावर लिहायलाच मजा येते".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT