Bigg Boss Marathi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात पार पडणार नॉमिनेशनचा नवीन टास्क, कोण कोणाला करणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi New Promo: बिगबॉसच्या चौथ्या आठवड्यात प्रत्येक स्पर्धकांमध्ये टास्क जिंकण्यासाठी लढाई सुरू आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉसच्या चौथ्या आठवडा फारच रंजक आहे. बिग बॉसच्या घरातील सुरू असलेला राडा सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या चौथ्या आठवड्यात प्रत्येक स्पर्धकांमध्ये टास्क जिंकण्यासाठी लढाई सुरू आहे. यावेळी प्रत्येक स्पर्धकाला नॉमिनेशनचा नवीन टास्क देण्यात आला आहे. नुकताच बिग बॉसचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे.

या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. प्रत्येक सदस्याला आपल्या गळ्यातील फोटो चुलीत टाकून योग्य कारण देऊन नॉमिनेट करायचे आहे. जान्हवीने आर्याचा फोटो गळ्यात टाकला असून ती म्हणतेय " हिचा फोटो गळ्यात टाकून फिरण्याची माझ्यावर वेळ आली आहे."

याचदरम्यान पॅडी अरबाजला म्हणतोय, "कॅप्टन झाल्यानंतरच सगळे नियम लक्षात येतात" तर अभिजीत म्हणतोय "चुकीचं करतोयस... आज नाहीतर उद्या तुला हे भोगावचं लागेल" आता अरबाजने काय केलं आहे ज्यामुळे सर्वच त्याच्यावर भडकले आहेत हे पाहणं महत्वाचे ठरेल. तसेच या नवीन टास्कमुळे बिग बॉसच्या घरात कोण कोणाला नॉमिनेट करणार आहे हे आज बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT