Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: अभिजीतच्या 'त्या' निर्णयावर जान्हवी संतापली, रडत रडत म्हणाली, या घरातली माझी किंमत...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना नवीन टास्क देण्यात आला आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना स्वत:ची किंमत ठरवावी लागणार आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन ५ चा लवकरच संपणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन ५ चा अंतिम सोहळा आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सध्या बिग बॉसचा १० वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना नवीन टास्क देण्यात आला आहे. यादरम्यानचा बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये, बिग बॉसने सर्व स्पर्धकांसाठी अनोखा टास्क आणला आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना स्वत:ची किंमत ठरवावी लागणार आहे.

प्रोमोमध्ये, बिग बॉस म्हणतो, “आज आपल्याला ठरवावी लागणार आहे स्वतःची या घरातील किंमत”, असं म्हणत ‘बिग बॉस’ काही रकमा लिहिलेल्या पाट्या स्पर्धकांसमोर ठेवतात. यावेळी अभिजीत स्वतःच मत देत म्हणतो, “२ लाख मी अंकिताला देईन”. यावर निक्की अभिजीतला विचारते, “आणि जान्हवीला चाळीस देणार आहेस का?”. यावर अभिजीत म्हणतो, “माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे”. तेव्हा डीपीही अभिजीतला बोलतो की, “मलाही असंच वाटतंय की तू ती गोष्ट करावी”.

हे ऐकून जान्हवी प्रचंड चिडते आणि म्हणते, “‘बिग बॉस’ या घरातील माझी चाळीस हजाराची किंमत माझी नाही आहे. त्यामुळे ही पाटी मी स्वीकारु शकणार नाही”. पुढे जान्हवी रागात ती पाटी फाडते. यामुळे आजच्या भागात कोणत्या सदस्याला किती किंमत मिळणार हे पाहणं औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT