Bigg Boss Marathi 5 Grand Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 Grand Finale : ग्रँड फिनालेसाठी टॉप ६ स्पर्धक निश्चित; विजेता, उपविजेताही ठरला?

Bigg Boss Marathi Grand Finale: बिग बॉसच्या खेळ लवकरच संपणार आहे. आता बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाला २८ जुलैपासून सुरूवात झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा एकमेकांसोबतचा राडा, मैत्री, प्रेम असा खेळ पाहायला मिळाला. बिग बॉसच्या या सीझनमध्ये अनेक लक्षवेधी घटना घडल्या ज्यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला. अशातच बिग बॉसच्या खेळ लवकरच संपणार आहे. आता बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना टॉप ६ स्पर्धक मिळाले आहेत.

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले आहेत. हे स्पर्धक आता अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता या ६ जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे. या दिवसाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 6 ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. अशातच आता 'बिग बॉस मराठी'ची सांगता होताच 'बिग बॉस हिंदी'च्या नव्या सीझनचा धमाका सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT