Jay Dudhane Trolled Nikki Tamboli Instagram
मनोरंजन बातम्या

Jay Dudhane News : "तू Bigg Boss मधली सर्वात वाईट…" निक्की तांबोळीला जय दुधानेने सुनावले खडेबोल, घरातील ‘या’ स्पर्धकाचं केलं कौतुक

Bigg Boss Marathi Ex contestant trolled Nikki Tamboli : सध्या निक्की तांबोळी अनेक मराठी सेलिब्रिटींच्या निशाण्यावर आली आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी ३’च्या उपविजेत्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत निक्कीला खडेबोल सुनावले.

Chetan Bodke

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झालेली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी ५’ची जोरदार चर्चा होत असून स्पर्धकांची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर निक्की तांबोळीची जेवढी चर्चा सुरू आहे, तिचे जितके कौतुक होत आहे, तितकंच तिला नेटकरी ट्रोल करीत आहेत. सध्या निक्की तांबोळी अनेक मराठी सेलिब्रिटींच्या निशाण्यावर आली आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी ३’च्या उपविजेत्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत निक्कीला खडेबोल सुनावले.

‘बिग बॉस मराठी ३’चा उपविजेता जय दुधानेने इन्स्टा स्टोरी शेअर करत निक्की तांबोळीला खडेबोल सुनावले आहेत. जय दुधाने ह्याने निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरसाठी खास इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. तर अभिजित सावंतचं कौतुक केले असून वर्षा उसगांवकर यांचा घरात झालेल्या अपमानाबद्दलही त्याने भाष्य केले आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये जयने लिहिलंय की, "निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस मराठी’च्या आजवरच्या इतिहासातली सगळ्यात वाईट स्पर्धक आहे."

Jay Dudhane Trolled Nikki Tamboli

तर जान्हवीबद्दल जयने लिहिलंय की, "मी अभिजीत सावंतचं नक्कीच कौतुक करेल कारण की, जान्हवी कशी तिच्या (निक्कीच्या) हातातलं 'बुगू बुगू' झालीये, हे अभिजितने सांगितलंय. महाराष्ट्राच्या सुपरस्टार अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत निक्की कशी वागलीये हे आपण सर्वांनीच पाहिलंय. अतिशय चुकीचं आणि अपमानास्पद ती वर्षा ताईंसोबत वागलीये. मी ज्या सीझनमध्ये होतो, तिथेही माझं अनेक स्पर्धकांसोबत भांडण झालं आहे. पण मला अजूनही लक्षात आहे, आमच्यातल्या एकाही स्पर्धकाने सीनियर असलेल्या स्पर्धकांसोबत चुकीच्या पद्धतीने वागणूक केली नाही. त्यांच्यासोबत सर्व व्यवस्थित वागायचे."

Jay Dudhane Post

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सोशल मीडिया एन्फ्ल्यून्सरसह अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटी शोमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या सीझनमध्ये वर्षा उसगांवकर, निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजित सावंत, घन: श्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील, धनंजय पोवार आणि गुलिगत धोका फेम सूरज चव्हाण.... असे स्पर्धक बिग बॉसच्या प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT