Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात अरबाजची पुन्हा एन्ट्री? निक्कीची खळी खुलली, 'तो' प्रोमो होतोय तुफान व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5: कलर्स मराठीवर सर्वांच लक्ष वेधून घेणारा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये पुन्हा अरबाजची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 दिवसेंदिवस वेगळे वळण घेताना दिसत आहे. सध्या बिग बॉसचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशातच बिग बॉसच्या घरात दररोज अनेक मंडळी भेट देताना दिसत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात राखी सांवतची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात राखी सांवत आता नेमक काय राडा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

कलर्स मराठीवर सर्वांच लक्ष वेधून घेणारा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये पुन्हा अरबाजची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात अरबाज दिसत आहे. यामुळे अरबाजची एन्ट्री नेमकी कशी झाली असा प्रश्न निर्माण होत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या एन्ट्री झालेली आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात शरद उपाध्ये स्पर्धकांच्या भाविष्याबद्दल सांगत आहेत.

बिग बॉस मराठीच्या आठव्या आठवड्यात कमी मत मिळाल्याने अरबाजने घराचा निरोप घेतला होता. अरबाज बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर घरातील स्पर्धकामध्ये आणि बिग बॉस प्रेमीमध्ये नाराजी पाहायला मिळाली. अशातच पुन्हा वाईल्ड कार्ड एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल जाईल अशी चर्चा सुरू होती. अशातच आता बिग बॉसच्या घरात पुन्हा अरबाज दिसत असल्याने आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT