Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: अंकिताने लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना दिली; कोकण हार्टेड गर्लने कारणही सांगितले, पाहा Video

Ankita Walawalkar: लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अंकिता राज ठाकरे यांच्या घरी गेली होती. याचदरम्यानचा अंकिताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या जबरदस्त चर्चेत आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिताने लवकरच ती लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता बिग बॉस संपल्यानंतर अंकिताच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. केळवणाला देखील सुरूवात झाली असून लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अंकिता राज ठाकरे यांच्या घरी गेली होती. याचदरम्यानचा अंकिताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता म्हणतेय राज ठाकरेंना लग्नाची सर्वात आधी बातमी दिल्याचं सांगितलं आहे.

पुढे तिने, नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरातील तुम्ही माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त इमोशनल मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात. त्यात आमचा एक गुण जुळला तो म्हणजे आमचे इमोशन्स. त्या इमोशन्समधली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे.

काही दिवसांपूर्वी 'येक नंबर' चित्रपटाचं काम चालू होतं आणि मला समजलं की, कुणाल या चित्रपटासाठी काम करतोय... तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. राज साहेबांना आम्ही सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी दिली होती.

नुकंतच दसऱ्याच्यादिवशी अंकिताने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अंकिताने सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करत सूर जुळले असं कॅप्शन दिलं. अंकिताचा होणारा नवरा कोकण हार्टेड बॉय दिग्दर्शक कुणाल भगत आहे. लवकरच आगामी काळात अंकिता आणि कुणाल लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT