Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "बाबा थांब ना तू..." वडिलांसाठी अंकिताने मानले बिग बॉसचे आभार

Bigg Boss Marathi Ankita Walawalkar: अंकिताच्या बाबांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताना दिसत आहे. अंकिता बाबांना पाहून भावुक झाली आहे.

Manasvi Choudhary

Latest Marathi Entertainment News Updates: बिग बॉस मराठीचा पाचवी सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक खूपच आनंदी दिसत आहे. सध्या बिग बॉसचा नववा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकला सुरूवात झाली आहे. अशातच अंकिताच्या घरच्यांनी बिग बॉसच्या घराला भेट दिली आहे. वडिल आणि बहि‍णींना पाहून अंकिता भलतीच खूश झालेली दिसतेय.

नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात अंकिताच्या दोन बहि‍णींची एन्ट्री होत आहे. बहि‍णींना पाहिल्यानंतर अंकिता त्यांना घट्ट मिठीत घेते. यानंतर बिग बॉस म्हणतात अंकिता फ्रीझ पुढे अंकिताच्या बाबांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होताना दिसत आहे. अंकिता बाबांना पाहून भावुक झाली आहे. अंकिता म्हणते थॅक्यू सो मच बिग बॉस तुम्ही माझ्या बांबाना पहिल्यांदाच मुंबईत आणले याबद्दल.

बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर कायमच घरच्यांच्या आठवणीत व्याकूळ झालेली दिसली. अंकिता घरच्यांपासून दूर असल्यामुळे तिला घरच्यांची आठवण येत असते. प्रत्येक सणानिमित्त अंकिताला तिच्या कोकणातील घराची आठवण येते. रक्षाबंधननिमित्त अंकिताने पोस्ट केली ज्यामध्ये अंकिताने आम्ही तिंघीही बहिणी आहोत लहानपणापासून एकमेकींसोबत रक्षाबंधन साजरे करतो यावर्षी तुमची ताई बिग बॉसच्या घरात असल्याने तुम्हाला मिस करत आहे.

गणपती या सणानिमित्त देखील अंकिताने सांगितलं होतं अंकिता म्हणाली, की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार,विसर्जन च्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हत.पण big boss च्या घरी असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय,तुम्हाला काळजी करावी लागणार नाही,७ व्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील .काळजी करू नका अशी भावना व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

Deccan Queen: पुणेकर आणि मुंबईकरांची लाईफलाईन! डेक्कन क्वीन झाली ९६ वर्षांची

Maharashtra News Live Update: शेखर गोरेंची नाराजी रास्त; पक्ष योग्य संधी देईल - जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT