Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: अंकिता घराबाहेर जाणार हे ऐकताच अभिजीत झाला इमोशनल; म्हणाला "मी संपलो..."

Ankita Walawalkar Exit : बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकरच्या एक्झिट होणार असल्याचे ऐकताच अभिजीत नाराज झाला आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. एकीकडे घरात आज कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. अभिजीत आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्की अंकिताला अभिजीतबद्दल सांगताना दिसून येणार आहे.

निक्की अंकिताला म्हणतेय,"माझ्यावरुन जास्त विश्वास अभिजीतचा तुझ्यावर आहे. कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही दोघं सोबत आहात. आमची फ्रेडशिप असली तरी त्याचं तुझ्यासोबत एक वेगळं कनेक्शन आहे. काल तू घराबाहेर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा अभिजीत म्हणाला होता की, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यावरुन वरचा दर्जा तो तुला देतो. त्याला तुझी गरज आहे".

अभिजीत अंकिताला म्हणतोय,"मी तुला एक सांगतो. आर्याचं मी मनोरंजन करत बसणार नाही". त्यावर अंकिता म्हणते,"मी आर्याला स्वत: सांगितलं आहे ज्या लेव्हलपर्यंत मी तुला समजावू शकते तिथपर्यंत मी समजवणार. पण त्यापुढे नाही". यावर अभिजीत म्हणतो,"आर्याला उगाच आपण भाव देतोय. ज्याचा काही अर्थच नाही. ग्रुपमध्ये आर्याची किंमत काय हे सर्वांना माहिती आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT